Bank Holidays in June 2022: जून महिन्यात 12 दिवस बंद राहणार बँका; पहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

ज्यात सर्व रविवार तसेच महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारचा समावेश होतो. जून महिन्यात कोणत्या दिवशी बँका बंद राहतील यासंदर्भात जाणून घेऊयात...

Image used for representational purpose (Photo Credit: PTI)

Bank Holidays in June 2022: जून महिना सुरू होण्यासाठी काही दिवस बाकी आहेत. अशा परिस्थितीत ज्या ग्राहकांना बँकेशी संबंधित कामे पूर्ण करायची आहेत, त्यांनी आगामी महिन्यात करावयाची सुट्टीची यादी तपासणे गरजेचे आहे. दरवर्षी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) भारतीय बँकांची बँक हॉलिडे लिस्ट प्रसिद्ध करते. याद्वारे ग्राहकांना बँका कोणत्या दिवशी बंद राहतील आणि कोणत्या दिवशी उघडतील याचे अपडेट्स अगोदर मिळतात.

आरबीआयकडून सुट्ट्यांची तीन श्रेणींमध्ये विभागणी -

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बँक सुट्टीची यादी तीन श्रेणींमध्ये विभागली आहे. यामध्ये निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स अॅक्ट, रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट हॉलिडे आणि बँक्स क्लोजिंग ऑफ खाती यांचा समावेश आहे. राष्ट्रीय सुट्यांव्यतिरिक्त, काही राज्यांत विशिष्ट सुट्ट्या असतात. ज्यात सर्व रविवार तसेच महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारचा समावेश होतो. जून महिन्यात कोणत्या दिवशी बँका बंद राहतील यासंदर्भात जाणून घेऊयात... (हेही वाचा - SBI Hikes Lending Rate: एसबीआयने ग्राहकांना दिला मोठा झटका! कर्जदरात केली 0.1 टक्के वाढ; तुमच्या EMI वर होणार 'असा' परिणाम)

'या' राज्यांमध्ये बँकांना सुट्ट्या -

जून महिन्यात देशभरात 12 दिवस बँका बंद राहणार आहेत. बँक कर्मचाऱ्यांना एकूण 12 सुट्या उपलब्ध आहेत. पण उत्तर प्रदेशात बँकांना फक्त 6 दिवस सुट्टी असेल. जूनमध्ये कोणताही विशेष दिवस किंवा सण नसल्याने केवळ सहा सुट्या असतात. यापैकी 4 रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार सुटी असणार आहे.