IPL Auction 2025 Live

Bank Holidays In December 2024: डिसेंबर महिन्यात ख्रिसमससह एकूण 17 दिवस बँकांना सुट्ट्या; बँका कधी बंद राहतील? जाणून घ्या

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या सुट्टीच्या कॅलेंडरनुसार, या महिन्यात एकूण 17 दिवस बँका बंद राहतील. यामध्ये रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार आणि सणांच्या सुट्ट्यांचा समावेश आहे.

Bank Holidays In December 2024 (फोटो सौजन्य - File Image)

Bank Holidays In December 2024: डिसेंबर महिना सुरू होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी उरला आहे. डिसेंबर महिन्यात देशातील बँका 17 दिवस बंद राहणार आहेत. डिसेंबरमधील 17 दिवसांच्या सुट्टीमध्ये शनिवार व रविवारच्या सुट्ट्यांचाही समावेश होतो. पुढील महिन्यात 5 रविवार येणार आहेत, त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांना 6 दिवसांऐवजी 7 दिवसांची साप्ताहिक रजा मिळणार आहे. नाताळ सण आणि स्थानिक सुट्ट्यांमुळे डिसेंबर महिन्यात बँका 17 दिवस बंद राहणार आहेत. या 17 दिवसांच्या सुट्या सर्व राज्यांमध्ये एकाच वेळी होणार नाहीत. RBI ने डिसेंबर महिन्यातील बँकांच्या सुट्टयांची यादी जाहीर केली आहे.

डिसेंबरमध्ये 17 दिवस बंद राहणार बँका -

डिसेंबर 2024 मध्ये राष्ट्रीय आणि स्थानिक सणांमुळे अनेक बँकांना सुट्ट्या असतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या सुट्टीच्या कॅलेंडरनुसार, या महिन्यात एकूण 17 दिवस बँका बंद राहतील. यामध्ये रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार आणि सणांच्या सुट्ट्यांचा समावेश आहे. (हेही वाचा -PAN 2.0: सरकारने जाहीर केला पॅन 2.0 प्रकल्प; नवीन कार्डमध्ये असणार QR Code, जाणून घ्या सविस्तर)

डिसेंबर 2024 मधील बँक सुट्ट्यांची संपूर्ण यादी -

डिसेंबरमध्ये 5 रविवार आहेत. त्यामुळे साप्ताहिक सुट्टीमुळे बँका सात दिवस बंद राहणार आहेत. या दिवसांमध्ये बँकेच्या शाखा बंद राहणार असल्या तरी, ग्राहक इंटरनेट बँकिंग, मोबाइल ॲप्स आणि एटीएमसारख्या डिजिटल सेवा वापरू शकतात.