Bank Holidays in October 2023: ऑक्टोबरमध्ये 16 दिवस बँका बंद राहणार; वाचा सुट्ट्यांची यादी

ऑक्टोबरमध्ये गांधी जयंती, महालया, काटी बिहू, दुर्गा पूजा, नवरात्री, दसरा, लक्ष्मीपूजा, सरदार वल्लभभाई पटेल जयंती यामुळे देशातील विविध भागात 16 दिवस बँका बंद राहणार आहेत.

Bank Holidays | Image used for representational purpose (Photo Credit: PTI)

Bank Holidays in October 2023: सप्टेंबर महिना संपण्यासाठी एक दिवसांचा कालावधी बाकी आहे. देशातील मध्यवर्ती बँक RBI ने ऑक्टोबर महिन्याच्या बँक सुट्ट्यांची यादी (Bank Holidays List) जाहीर केली आहे. ऑक्टोबर महिन्यात बँका एक-दोन दिवस नाही तर एकूण 16 दिवस बंद राहणार आहेत. यामध्ये वीकेंडचाही समावेश आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला पुढील महिन्यात शाखेत जाऊन बँकेचे कोणतेही काम पूर्ण करायचे असेल, तर घर सोडण्यापूर्वी आरबीआयचे हॉलिडे कॅलेंडर नक्कीच तपासा. ऑक्टोबरमध्ये गांधी जयंती, महालया, काटी बिहू, दुर्गा पूजा, नवरात्री, दसरा, लक्ष्मीपूजा, सरदार वल्लभभाई पटेल जयंती यामुळे देशातील विविध भागात 16 दिवस बँका बंद राहणार आहेत.

सर्वप्रथम 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीनिमित्त बँकांना सुट्टी असेल. यानंतर पितृ पक्ष संपताच देशात पुन्हा एकदा सणांचा हंगाम सुरू होईल. ऑक्टोबर महिन्यात दुर्गापूजा, नवरात्री, दसरा असे अनेक सण येतात. अनेक सणांमुळे, बँका ऑक्टोबरमध्ये 16 दिवस बंद राहणार आहेत. या 16 दिवसांच्या सुट्यांमध्ये चारही रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार समाविष्ट आहे. एकंदरीत ऑक्टोबरमध्ये साप्ताहिक सुट्ट्यांमुळे 6 दिवस आणि सणांमुळे 10 दिवस बँका बंद राहणार आहेत. RBI च्या अधिकृत वेबसाइट https://rbi.org.in/Scripts/HolidayMatrixDisplay.aspx या लिंकवर क्लिक करून तुम्ही सुट्ट्यांची यादी देखील पाहू शकता. (हेही वाचा - Govt Raises Interest Rate on Recurring Deposit: सर्वसामान्यांसाठी खुशखबर! सरकारने 5 वर्षांच्या आवर्ती ठेवींवरील व्याजदर 6.7 टक्क्यांपर्यंत वाढवला)

ऑक्टोबर महिन्यातील बँकेच्या सुट्ट्यांची यादी -

2 ऑक्टोबर 2023 (सोमवार)- गांधी जयंती

14 ऑक्टोबर 2023 (शनिवार) – महालय-कोलकाता येथे बँका बंद राहतील.

18 ऑक्टोबर 2023 (बुधवार) – काटी बिहू – आसाममध्ये बँका बंद राहतील.

21 ऑक्टोबर 2023 (शनिवार) – दुर्गा पूजा (महा सप्तमी) – पश्चिम बंगाल, त्रिपुरा, आसाम आणि मणिपूरमध्ये बँका बंद.

23 ऑक्टोबर 2023 (सोमवार) – महानवमी, आयुधा पूजा, दुर्गा पूजा – बिहार, झारखंड, आसाम, त्रिपुरा, कर्नाटक, ओरिसा, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि केरळमध्ये बँका बंद राहतील.

24 ऑक्टोबर 2023 (मंगळवार) - दसरा म्हणजेच विजयादशमी, दुर्गा पूजा - आंध्र प्रदेश, मणिपूर वगळता सर्व राज्यांमध्ये बँका बंद राहतील.

25 ऑक्टोबर 2023 (बुधवार) – दुर्गा पूजा (दसैन) – सिक्कीममध्ये बँका बंद राहतील.

26 ऑक्टोबर 2023 (गुरुवार) – दुर्गा पूजा (दसैन) / विलीनीकरण दिवस – जम्मू आणि काश्मीर आणि सिक्कीममध्ये बँका बंद.

27 ऑक्टोबर 2023 (शुक्रवार) – दुर्गा पूजा (दसैन) – सिक्कीममध्ये बँका बंद राहतील.

28 ऑक्टोबर 2023 (शनिवार) – लक्ष्मी पूजा – पश्चिम बंगालमध्ये बँका बंद राहणार आहेत.

31 ऑक्टोबर 2023 (मंगळवार) – सरदार वल्लभभाई पटेल जयंती – गुजरातमध्ये बँका बंद राहतील.

RBI प्रत्येक महिन्यात बँकेच्या सुट्ट्यांची यादी जाहीर करत असते. ऑक्टोबर महिन्यातील बँक सुट्ट्यांची यादी आरबीआयने जाहीर केली असून या यादीनुसार, पुढील महिन्यात बँका 16 दिवस बंद राहणार आहेत.



संबंधित बातम्या