Bank Holidays in August 2024: ऑगस्ट महिन्यात 13 दिवस बँका बंद, पाहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

पुढच्या महिन्यात 14 दिवस बँका बंद असतील. ऑगस्ट महिन्यात तुमची बँकांची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

Photo Credit -X

Bank Holidays in August: ऑगस्ट महिना चालू होण्यासाठी काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे सर्वांनाच ऑगस्ट महिन्यात करावयाच्या कामांचे वेध लागले आहे. ऑगस्ट महिन्यात बँकांची कामे अडून राहू नयेत यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. यावर्षीच्या सर्वाधीक सुट्ट्या ऑगस्ट महिन्यात (August Bank Holiday)आहेत. कोणत्याही कामासाठी आर्थिक व्यवहार (Financial transactions) पूर्ण असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे बँकेच्या कामाचे नियोजन करण्याआधी ऑगस्ट महिन्यात एकूण किती सुट्ट्या आहेत, हे जाणून घेणे गरजेचे आहे.(हेही वाचा: Union Bank of India Scam Case: युनियन बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी केला 94 कोटींचा घोटाळा; गैरव्यवहारप्रकरणी 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल)

ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधन, जन्माष्टमी हे मोठे सण असणार आहेत. त्यानंतर 15 ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्यदिन आहे. या सुट्ट्या लक्षात घेऊनच तुम्ही तुमचे बँकेचे काम ठरवायला हवे. रक्षाबंधन, जन्माष्टमी आणि भारतीय स्वातंत्र्यदिनी संपूर्ण देशातील बँकांना सुट्टी असेल. यासह ऑगस्ट महिन्यात एकूण चार रविवार आणि दोन शनिवार आहेत. या दिवशीही संपूर्ण देशातील बँका बंद अशतील. यासह वेगवेगळ्या राज्यांत स्थानिक सणांनुसार बँका बंद असतील. (हेही वाचा: 'हे' आर्थिक नियम; तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम)

ऑगस्ट महिन्यातील सुट्ट्यांची यादी

3 ऑगस्ट- केर पूजा - अगरतळामध्ये बँकांना सुट्टी असेल

4 ऑगस्ट- रविवार - पूर्ण देशात बँकांना सुट्टी

7 ऑगस्ट- हरियाली तीज - हरियाणामध्ये बँकांना सुट्टी असेल

8 ऑगस्ट- तेंदोंग लो रम फॅट - गंगटोकमध्ये बँकांना सुट्टी असेल

10 ऑगस्ट- दुसरा शनिवार - संपूर्ण देशात बँकांना सुट्टी असेल

11 ऑगस्ट- रविवार - संपूर्ण देशात बँकांना सुट्टी असेल

13 ऑगस्ट- पेट्रियॉट डे - इम्फाळमध्ये बँकांना सुट्टी असेल

15 ऑगस्ट- स्वातंत्र्यदिन - संपूर्ण बँकांना सुट्टी असेल

18 ऑगस्ट- रविवार - संपूर्ण देशात बँकांना सुट्टी असेल

19 ऑगस्ट- रक्षाबंधन - अहमदाबाद, जयपूर, कानपूर, लखनौ यासह देशातील अनेक ठिकाण बँकांना सुट्टी असेल

20 ऑगस्ट- श्री नारायण गुरु जयंती - कोची आणि तिरुअनंतपूरम या भागात बँकांना सुट्टी असेल

24 ऑगस्ट- चौथा शनिवार - संपूर्ण देशात बँकांना सुट्टी असेल

25 ऑगस्ट- रविवार - संपूर्ण देशात बँकांना सुट्टी असेल

26 ऑगस्ट- जन्माष्टमी - पूर्ण देशात बँकांना सुट्टी असेल

तुम्हाला या सुट्ट्यांबद्दल अधिक माहिती हवी असेल तर आरबीआयच्या https://rbi.org.in/Scripts/HolidayMatrixDisplay.aspx या संकेतस्थळाला भेट देऊ शकता. यूपीआय, नेट बँकिंग, मोबाईल बँकिंगच्या सेवा चालूच असतील. आरबीआयकडून प्रत्येक महिन्याला सुट्ट्यांची लिस्ट प्रसिद्ध खेली जाते. सुट्ट्यांची ही यादी संकेतस्थळावर पाहता येते. याच यादीनुसार ऑगस्ट महिन्यात एकूण 14 दिवस सुट्ट्या आहेत. म्हणजेच ऑगस्टमध्ये एकूण 14 दिवस बँका बंद असतील. ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधन, जन्माष्टमी, स्वातंत्र्यदिन असल्यामुळे सुट्ट्या वाढल्या आहेत.