Bank Holiday 13 May: देशातील 96 शहरांमध्ये सोमवारी बँकेला सुट्टी; बँकेत जाण्यापूर्वी 'ही' यादी नक्की वाचा

देशात 7 टप्प्यात सार्वत्रिक निवडणुका होत आहेत, त्यामुळे मतदान होणाऱ्या शहरांमध्ये बँकेला सुट्टी असेल.

Bank Holidays | Image used for representational purpose (Photo Credit: PTI)

Bank Holiday 13 May: उद्या, 13 मे 2024 रोजी देशातील 10 राज्यांतील 96 शहरांमध्ये बँकांना सुट्टी असेल. लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) चौथ्या टप्प्यासाठी 13 मे रोजी मतदान होणार आहे, त्यामुळे या शहरांमध्ये बँकांना सुट्टी (Bank Holiday) असणार आहे. देशात 7 टप्प्यात सार्वत्रिक निवडणुका होत आहेत, त्यामुळे मतदान होणाऱ्या शहरांमध्ये बँकेला सुट्टी असेल.

या शहरांमध्ये होणार मतदान -

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात आंध्र प्रदेश, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, तेलंगणा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मीर या 10 राज्यांमध्ये एकूण 96 जागांवर मतदान होणार आहे. यामध्ये अराकू, श्रीकाकुलम, विजयनगरम, विशाखापट्टणम, अनकापल्ले, काकीनाडा, अमलापुरम, राजमुंद्री, नरसापुरम, एलुरु, मछलीपट्टणम, विजयवाडा, गुंटूर, नरसराओपेट, बापटला, ओंगोले, नंद्याल, कुरनूल, अनंतपुर, राजपुरे, हिंदूपुरम, कुरनूल, कूड्डापूर, चित्तूर, दरभंगा, उजियारपूर, समस्तीपूर, बेगुसराय, मुंगेर, सिंगभूम, खुंटी, लोहरदगा, पलामू, देवास, उज्जैन, मंदसौर, रतलाम, धार, इंदूर, खरगोन, खांडवा, नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड, कालाहंडी, नबरंगपूर, बेरहामपूर, कोरापुट, आदिलाबाद, पेड्डापल्ले, करीमनगर, निजामाबाद, झहीराबाद, मेडक, मलकाजगिरी, सिकंदराबाद, हैदराबाद, चेवेल्ला, महबूबनगर, नगरकरनूल, महाबुबनगर, नलगोंडा, महाबुबनगर खम्मम, शाहजहानपूर, खेरी, धौराहारा, सीतापूर, हरदोई, मिस्रिख, उन्नाव, फारुखाबाद, इटावा, कन्नौज, कानपूर, अकबरपूर, बहराइच, बहरामपूर, कृष्णनगर, राणाघाट, वर्धमान-पूर्व, वर्धमान-दुर्गापूर, आसनसोल, बिरबपुर, श्रीनगर मतदारसंघाचा समावेश आहे. (हेही वाचा - Rule Change From 1st May: LPG Cylinder पासून Saving Account मध्ये झाले 'हे' मोठे बदल; तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम)

मे महिन्यातील बँक सुट्ट्यांची यादी -

बँकांच्या सुट्ट्यांची यादी सर्व राज्यांमध्ये सारखी नसते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) नुसार, सर्व राज्यांच्या सुट्ट्यांची यादी वेगळी आहे. या सुट्ट्यांची संपूर्ण यादी आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर दिली आहे, ज्यामध्ये राज्यांनुसार विविध सण आणि सुट्ट्यांची संपूर्ण माहिती दिली आहे.

दरम्यान, बँका बंद राहिल्या तरी ग्राहकांना कोणतीही अडचण येणार नाही. सुट्टीच्या दिवशीही लोक ऑनलाइन बँकिंगच्या मदतीने आपली सर्व कामे पूर्ण करू शकतात. बँकेच्या बहुतांश सेवा ऑनलाईन उपलब्ध आहेत. त्यामुळे सुट्टीच्या दिवशीही तुम्ही घरबसल्या बँकेशी संबंधित अनेक कामे पूर्ण करू शकता.