Bank Holiday in February 2021: फेब्रुवारी महिन्यात बँकेत जाण्यापूर्वी 'या' सुट्टीच्या तारखा नक्की लक्षात ठेवा
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त 19 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील बँका बंद राहतील.
Bank Holiday in February 2021: प्रत्येक महिन्याप्रमाणे फेब्रुवारीमध्येही काही दिवस बँका बंद राहतील. या दिवशी बँकांना सुट्टी असणार आहे. जर आपण फेब्रुवारी महिन्यात बँकेत जाण्याचा विचार करत असाल तर बँकेच्या शाखेत जाण्यापूर्वी कृपया फेब्रुवारीचे सुट्टीचे कॅलेंडर नक्की तपासा. फेब्रुवारी महिन्यात बँकांची सुट्टी वेगवेगळ्या राज्यातील उत्सवावर आधारित असते. 12 फेब्रुवारीला सिक्कीमच्या बँकांना सुट्टी आहे, या दिवशी सोनम लोसारच्या निमित्ताने बँका बंद ठेवल्या जातील. याशिवाय 13 फेब्रुवारी ला महिन्याचा दुसरा शनिवार आहे. म्हणून त्या दिवशी बँका बंद राहतील.
याशिवाय लुई नगाई नीच्या निमित्ताने बँकेला सुट्टी असल्याने 15 फेब्रुवारी रोजी मणिपूरच्या बँका बंद राहतील. तसेच येत्या 16 फेब्रुवारी रोजी वसंत पंचमी आहे. या दिवशी पंजाब, हरियाणा, ओरिसा, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालमधील बँका बंद राहतील. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त 19 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील बँका बंद राहतील. (वाचा - February 2021: 1 फेब्रुवारी पासून होणार 'हे' मोठे बदल; जाणून घ्या तुमच्या जीवनावर कसा परिणाम होणार)
मिझोरम आणि अरुणाचलच्या बँका 20 फेब्रुवारीला बंद राहतील. 26 फेब्रुवारी रोजी हजरत अली जयंतीनिमित्त उत्तर प्रदेशमध्ये सुट्टी असेल. त्याचबरोबर गुरु रविदास जयंतीनिमित्त 27 फेब्रुवारीला चंडीगड, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि पंजाबच्या बँका बंद असतील.
यावर्षी बँकांना सुमारे 40 दिवसांची सुट्टी -
1 फेब्रुवारी रोजी सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करण्यात येईल. मार्चमध्ये आर्थिक वर्ष संपेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) वर्षभराच्या सुट्टीच्या यादीनुसार, यावर्षी बँका 40 दिवसांपेक्षा अधिक काळ बंद राहतील. तथापि, त्यात शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचा समावेश आहे. रविवारीशिवाय महिन्याच्या दुसर्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद राहतील.