आगामी नववर्ष 2025 मध्ये EPFO कडून या 5 बदलांची शक्यता; कोट्यावधी नोकरदारांना होणार फायदा
रिटायरमेंट फंड अधिक चांगल्याप्रकारे निर्माण करण्यासाठी आणि त्याचा फायदा करून घेण्याच्या उद्देशाने हा बदल लागू केले जात आहेत.
EPFO कडून आता नोकरदार लोकांसाठी काही महत्त्वाचे बदल जारी करण्यात आले आहेत. यामुळे कोट्यावधी नोकरदारांवर त्याचा परिणाम होणार आहे. आगामी नववर्ष 2025 पासून या बदलांना सुरूवात होईल. रिटायरमेंट फंड अधिक चांगल्याप्रकारे निर्माण करण्यासाठी आणि त्याचा फायदा करून घेण्याच्या उद्देशाने हा बदल लागू केले जात आहेत. खाजगी क्षेत्रात आणि सरकारी कर्मचारी अशा दोघांनाही या बदलामुळे फायदा होणार आहे. मग पहा 2025 या आगामी वर्षामध्ये होणारे हे बदल कोणते असतील?
एटीएम मधून काढता येऊन पीएफ मधील पैसे
पीएफ च्या सर्व्हिस मधील सर्वात मोठा बदल म्हणजे आता ईपीएफओ त्यांच्या सब्सक्रायबर्सना एटीएम कार्ड देणार आहे. ज्याचा वापर करून 24/7 कधीही पैसे काढता येऊ शकतील. ही ATM withdrawal facility आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये लागू होण्याचा अंदाज आहे.
या सुविधेमुळे आता लोकांना तातडीने पैसे काढता येतील. सध्या मेंबर्सना 7-10 दिवस थांबावं लागत आहे. हे पैसे पीएफ अकाऊंट मधून बॅंक अकाऊंट मध्ये वळते केले जातात.
कर्मचार्याच्या Contribution Limit मध्ये बदल
आता EPF contribution cap मध्येही बदल होणार आहे. सध्या कर्मचारी त्याच्या बेसिक सॅलरीच्या 12% वाटा पीएफ मध्ये गुंतवत आहे. पण आता कर्मचार्यांना ईपीएफओ कडून देण्यात आलेली 15 हजार रूपयांची लिमिट बंधनकारक नसेल. ही पॉलिसी अंमलात आणल्यानंतर कर्मचारी अधिक रक्कम देखील गुंतवून रिटायरमेंटच्या वेळेस अधिक पेंशन मिळवू शकतो.
ईपीएफओ आयटी सिस्टिम अपग्रेड
ईपीएफओ सध्या IT infrastructure अपग्रेड करण्यावर लक्ष देत आहे. त्यामुळे आता पीएफ क्लेम करणार्यांसोबतच त्याच्या लाभार्थ्यांना झटपट पैसे मिळतील. हे अपग्रेड 2025 पर्यंत होण्याचा अंदाज आहे. एकदा IT infrastructure अपग्रेड झाले की मेंबर्सचा क्लेम लवकर सेटल होण्यास मदत होईल. सोबतच व्यवहारांमध्ये पारदर्शकता वाढेल त्यामुळे फ्रॉड होण्याचे प्रकार कमी होतील.
Equity मध्ये गुंतवणूकीची संधी
ईपीएफओ कडून आता मेंबर्सना पैसे Equity मध्ये गुंतवता येणार आहे. यामध्ये मेंबर्सना पैसे अधिक चांगल्या प्रकारे मॅनेज करण्याची संधी दिली जाईल. direct equity investment चा पर्याय ईपीएफओ ने दिल्यास मेंबर्सना अधिक चांगले रिटर्न्स मिळू शकतात.
Pension Withdrawal सुकर होणार
पेंशनर्स साठी काही महत्त्वाचे बदल होणार आहेत. यामध्ये पेंशनर्स देशात कोणत्याही बॅंकेमधून ते पैसे काढू शकतील. त्यासाठी अधिकचे व्हेरिफिकेशन नसेल.