Amazon Great Freedom Festival Sale 2023: ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनच्या 'ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेल 2023' ची घोषणा; जाणून घ्या तारखा व अपेक्षित ऑफर्स

मात्र कंपनीने शेअर केलेल्या काही टीझर्सनुसार, एसबीआय कार्ड वापरकर्त्यांना क्रेडिट कार्ड आणि इएमआय व्यवहारांवर 10% त्वरित सूट मिळेल.

Amazon (PC - Pixabay)

देशातील प्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन (Amazon) पुन्हा एकदा मोठा सेल घेऊन येत आहे. कंपनीने नुकतेच आपल्या ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेल 2023 (Amazon Great Freedom Festival Sale 2023) ची घोषणा केली. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला ऑनलाइन शॉपिंग करायची असेल तर ही तुमच्यासाठी एक चांगली संधी ठरू शकते. साइटवर दिलेल्या माहितीनुसार, Amazon चा हा सेल 5 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. यावेळी अनेक धमाकेदार ऑफर्स देण्यात येणार आहेत. जर तुम्ही प्राइम मेंबर असाल तर हा सेल तुमच्यासाठी 12 तास अगोदर सुरू होईल. म्हणजेच 4 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजल्यापासून तुम्ही तुमची आवडती उत्पादने सवलतीच्या दरात खरेदी करू शकाल.

ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेलसाठी अॅमेझॉनने अजून ऑफर्स आणि डील्सबद्दल अधिक खुलासा केलेला नाही. मात्र कंपनीने शेअर केलेल्या काही टीझर्सनुसार, एसबीआय कार्ड वापरकर्त्यांना क्रेडिट कार्ड आणि इएमआय व्यवहारांवर 10% त्वरित सूट मिळेल. ग्राहकांना 5000 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळण्याची संधी असेल. याशिवाय, तुम्हाला 30 लाखांपेक्षा जास्त उत्पादनांवर 30% पर्यंत अतिरिक्त सूट मिळेल. तसेच सर्वाधिक विक्री होणाऱ्या कॉम्बोवर 40% पर्यंत सूट मिळणार आहे.

कंपनीने यावर्षीच्या ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेलसाठी स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीजवर 40% पर्यंत सूट जाहीर केली आहे. तसेच 12 महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट ईएमआय असेल आणि 35,000 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज डील असेल. (हेही वाचा: Telangana: काय सांगता? शेतकऱ्याने टोमॅटो विकून 15 दिवसांत कमावले तब्बल 2 कोटी रुपये; जाणून घ्या सविस्तर)

असे सांगितले जात आहे की, सेल दरम्यान स्मार्टफोनवर 40 टक्के सूट मिळू शकते. लॅपटॉपवर 40% सूट, स्मार्ट टीव्हीवर 60% सूट, स्मार्टवॉचवर 80% सूट, टॅब्लेटवर 50% सूट आणि स्टोरेज डिव्हाइसवर 70% सूट प्राप्त होऊ शकेल. मात्र, सवलतीचा नेमका तपशील विक्रीदरम्यानच समोर येईल.

(हा लेख फक्त माहितीसाठी लिहिला आहे. लेटेस्टली मराठी याची पुष्टी करत नाही. कोणतीही ऑफर किंवा सवलतीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.)