PAN-Aadhaar linking न झाल्याने देशात 11.5 पॅन कार्ड्स डिअॅक्टिव्हेट; तुमचं आधार-पॅन लिंक आहे का? असं तपासा!
Aadhaar documents मोफत अपडेट करण्याची तारीख UIDAI ने 14 सप्टेंबर 2023 ते 14 डिसेंबर 2023 पर्यंत 3 महिन्यांनी वाढवली आहे. याशिवाय UIDAI ने 10 वर्षांच्या कार्डधारकांना नवीन माहितीसह तपशील अपडेट करण्यास सांगितले आहे.
Central Board of Direct Taxes (CBDT) ने एका आरटीआय ला दिलेल्या उत्तरामध्ये माहिती देताना दिलेल्याआकडेवारीनुसार,आधार-पॅन कार्ड यांना एकत्र न जोडल्याने देशात सुमारे 11.5 कोटी अकाऊंट्स डिअॅक्टिव्हेट करण्यात आली आहेत. 'हिंदू' चा त्याबद्दल रिपोर्ट आहे. आयकर विभागाच्या नियमावलीनुसार आधार पॅन लिकिंग अनिवार्य आहे आणि त्यासाठी 30 जून 2023 पर्यंत मुदत होती.
70.24 कोटी पॅनकार्ड धारक भारतामध्ये आहेत. त्यापैकी 57.25 कोटी लोकांनी ही आधार-पॅनची जोडणी केलेली आहे. त्यामुळे आता सुमारे 12 कोटी पॅन कार्ड्स त्यामध्ये 11.5कोटी डिअॅक्टिव्हेट करण्यात आल्याचं एका आरटीआय मध्ये सांगितलं आहे. मध्य प्रदेशात Chandra Shekhar Gaur यांनी मागावलेल्या माहितीमध्ये याची आकडेवारी समोर आली आहे. या मध्ये असेही सांगण्यात आले आहे की 1000 रूपये रक्कम दंड म्हणून भरल्यास ती अकाऊंट्स पुन्हा रिअॅक्टिव्हेट केली जाऊ शकतात.
Income Tax Act कलम 139AA मध्ये अशी तरतूद आहे की 1 जुलै 2017 पासून PAN वाटप करण्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीने आणि आधार क्रमांक मिळविण्यासाठी पात्र असलेल्या प्रत्येक व्यक्तीला विहित फॉर्ममध्ये आधार क्रमांक कळवावा. अशा व्यक्तींनी नियोजित मुदतीपूर्वी त्यांचे आधार आणि पॅन अनिवार्यपणे लिंक करणे आवश्यक आहे.
PAN-Aadhaar linking झाले आहे की नाही? कसं तपासाल?
Income Tax e-filing portal / www.incometax.gov.in/iec/foportal/ ओपन करा.
होमपेजवर ‘Link Aadhaar Status’पहा
आता तुमचा पॅन नंबर आणि आधार नंबर टाका.
त्यानंतर 'View Link Aadhaar Status'वर क्लिक करा.
बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार, Aadhaar documents मोफत अपडेट करण्याची तारीख UIDAI ने 14 सप्टेंबर 2023 ते 14 डिसेंबर 2023 पर्यंत 3 महिन्यांनी वाढवली आहे. याशिवाय UIDAI ने 10 वर्षांच्या कार्डधारकांना नवीन माहितीसह तपशील अपडेट करण्यास सांगितले आहे. नाव, पत्ता आणि विवाह किंवा मृत्यू झाल्यास नातेवाईकांचे तपशील इत्यादी तपशील अपडेट करावे लागतील. तपशील UIDAI च्या वेबसाइटवर किंवा थेट जाऊन ₹ 25 भरून अपडेट करून दिले जातील.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)