Indore Shocker: इंदूरमध्ये मंदिरात गोळीबाराची घटना, दोघांवर गोळ्या झाडून आरोपीने स्वत:लाही संपवले; प्रेम प्रकरणातून गोळीबार झाल्याचा अंदाज

इंदूरमध्ये एका मंदिरात गोळीबाराची घटना घडली. ज्यात आरोपीने आधी दोघांवर गोळी झाडून त्यांची हत्या केली. त्यानंतर मदिंराच्या पार्किंगमध्ये आरोपीने स्वत:वरही गोळी झाडून आत्महत्या केली. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. लव्ह ट्रेंगलमधून हा प्रकार घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Indore Shocker: इंदूरमध्ये मंदिरात गोळीबाराची घटना, दोघांवर गोळ्या झाडून आरोपीने स्वत:लाही संपवले; प्रेम प्रकरणातून गोळीबार झाल्याचा अंदाज
gun shot representative image PC Pixa

Indore Shocker: इंदूरमध्ये त्रिशंकू प्रेम प्रकरणा (love affair)तून गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. यात एका महाविद्यालयीन तरूणीची आणि तरूणाची गोळया झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर आरोपीनेही स्वतःवर गोळया झाडून (shoot) आत्महत्या केली. गुरुवारी दुपारी एका मंदिरात ही घटना घडली. ज्यात स्नेहा जाट (२२) आणि दीपक जाट यांचा मृत्यू झाला. तर अभिषेक यादव (26) असे आरोपीचे नाव आहे. त्याचा ही मृत्यू झाला आहे.

टाईम्स ऑफ इंडीयाने दिलेल्या वृत्तानुसार, ते तिघेही एकमेकांना ओळखत होते. अभिषेक याने स्नेहा हिला फोन केला. तिला मंदीरात बोलवले. त्यावेळी दीपक हा तेथेच उपस्थित होता. मग, ते स्कूटरने मंदिरात पोहोचले. त्यानंतर तिघांनी मंदिरात एकत्र पूजा केली, आणि काही वेळातच अभिषेक याने त्या दोघांवर गोळीबार केला. दरम्यान, जीव वाचवण्यासाठी दिपक आणि स्नेहाने मंदिरातून पळण्याचा प्रयत्न केली. मात्र, या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंचक अभिषेक पार्किंगच्या दिशेने धावला आणि तेथे त्याने स्वतःवर गोळी झाडली.

दरम्यान, स्नेहा जाट आणि दीपक जाट हे नातेसंबंधातले असल्याचे समजते. मात्र, लव्ह ट्रेंगलमधून हा प्रकार घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अभिषेक याने त्या दोघांची हत्या का केली? याचा तपास सध्या सुरू आहे. असे. अतिरिक्त आयुक्त अमित सिंह यांनी सांगितले.

 

(The above story first appeared on LatestLY on Apr 05, 2024 04:16 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).