पाकिस्तानी नौदलाने (Pakistan Navy) गुरुवारी सांगितले की, अरबी समुद्रात एका जहाजाच्या बुडण्यापासून नऊ भारतीय क्रू सदस्यांना (Indian Crew Members) वाचवले. पाकिस्तानी नौदलाच्या जनसंपर्क महासंचालकांनी एका निवेदनात म्हटले आहे की, बलुचिस्तान प्रांतातील ग्वादर या तटीय शहराजवळ 9 ऑगस्ट रोजी भारतीय जहाज 'जमना सागर' बुडाल्याची घटना घडली. त्यात 10 क्रू मेंबर्स होते. निवेदनानुसार, नौदलाला जहाजाबद्दल माहिती मिळाली, त्यानंतर पाकिस्तान सागरी माहिती केंद्राने जवळच्या व्यापारी जहाज एमटी क्रुइबेकेला भारतीय जहाजाच्या चालक दलाला आवश्यक मदत पुरवण्याची विनंती केली. व्यापारी जहाजाने शेवटी नऊ क्रू मेंबर्सची सुटका केली, असे निवेदनात म्हटले आहे. त्यात म्हटले आहे की पाकिस्तान नौदलाच्या जहाजाला नंतर बेपत्ता क्रू मेंबरचा मृतदेह सापडला, जो पाकिस्तान सागरी सुरक्षा एजन्सीकडे सोपवण्यात आला.
त्यांनी असे ही म्हटले आहे की, आमच्या व्यापारी जहाजाने नऊ क्रू मेंबर्सची समुद्रातून सुखरुप सुटका केली आणि दुबईतील एका बंदरावर त्यांना सोडले, असेही निवेदनात म्हटले आहे. त्याचवेळी, दोन हेलिकॉप्टरसह पाकिस्तानी नौदलाचे जहाज देखील या भागात पोहोचले आणि मदतकार्य सुरु केले. पाकिस्तानच्या प्रादेशिक पाण्याचे क्षेत्र 12 नॉटिकल मैल आहे. 2015 मध्ये त्याचा सागरी क्षेत्र (EEZ) 290,000 चौरस किलोमीटरपर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यामुळे ही मदत करता आली. (हे देखील वाचा: Transgender Pilot: आता भारतात ट्रान्सजेंडर देखील बनू शकतात पायलट; DGCA ने जारी केले मार्गदर्शक तत्त्वे)
दरम्यान, उझबेकिस्तानमधील समरकंद येथे होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषदेदरम्यान भारत आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शाहबाज शरीफ यांच्यात बैठक होण्याची शक्यता आहे. राजनैतिक सूत्रांनी एका माध्यम संस्थेला ही माहिती दिली. 'डेली जंग'ने आपल्या एका वृत्तात म्हटले आहे की, SCO शिखर परिषद 15-16 सप्टेंबर रोजी होणार आहे, जिथे संघटनेचे नेते प्रादेशिक आव्हानांवर चर्चा करण्यासाठी एकत्र भेटतील.