Indian Railways: भारतीय रेल्वेने 31 मे पर्यंत 'या' गाड्या केल्या रद्द; प्रवासापूर्वी चेक करा रेल्वे गाड्यांची यादी
प्रवाशांची संख्या कमी झाल्याने रेल्वेने आपल्या अनेक रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. आता उत्तर रेल्वेने सुमारे 11 विशेष गाड्या रद्द केल्या आहेत.
Indian Railways: कोरोना साथीच्या काळात रेल्वेने अनेक गाड्या रद्द केल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय रेल्वे निरंतर आणि मोठ्या संख्येने गाड्या रद्द करत आहे. प्रवाशांची संख्या कमी झाल्याने रेल्वेने आपल्या अनेक रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. आता उत्तर रेल्वेने सुमारे 11 विशेष गाड्या रद्द केल्या आहेत. रेल्वेने म्हटले आहे की, या गाड्या परिचालन क्षेत्रामुळे रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वेने अमृतसर, पठाणकोट, अंबाला कॅंट, लुधियाना, फाजिका जंक्शन, बठिंडा, गोरखपूर, लखनऊ, जबलपूर, हरिद्वार, आग्रा यासह अनेक मार्गांवरील गाड्या रद्द केल्या आहेत.
उत्तर रेल्वेने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे, सर्व संबंधितांना कळविण्यात आले आहे की, ऑपरेशनल कारणास्तव त्यांना दर्शविल्या गेलेल्या तारखांमधून खालील विशेष गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (वाचा - Pune Metro Rail Recruitment: पुणे मेट्रो रेल प्रोजेक्ट मध्ये नोकरीची संधी; 15 मे पूर्वी असा करा अर्ज)
प्रवास करण्यापूर्वी रद्द केलेल्या गाड्यांची संपूर्ण यादी तपासा
04659 अमृतसर जंक्शन-पठाणकोट जंक्शन अनारक्षित मेल / एक्सप्रेस स्पेशल 15 मे पासून पुढील आदेश येईपर्यंत रद्द
04660 पठाणकोट जंक्शन-अमृतसर जंक्शन अनारक्षित मेल / एक्सप्रेस स्पेशल 16 मे पासून पुढील आदेश येईपर्यंत रद्द
04503/04504 अम्बाला कँट-लुधियाना जंक्शन/ कँट अनारक्षित मेल / एक्सप्रेस स्पेशल 15 मे पासून पुढील आदेश येईपर्यंत रद्द
04632 फजिका जंक्शन-बठिण्डा जंक्शन अनारक्षित मेल / एक्सप्रेस स्पेशल 15 मे पासून पुढील आदेश येईपर्यंत रद्द
04631 बठिण्डा जंक्शन-फजिका जंक्शन अनारक्षित मेल / एक्सप्रेस स्पेशल 16 मे पासून पुढील आदेश येईपर्यंत रद्द
02531/02532 गोरखपुर-लखनऊ-गोरखपुर स्पेशल 13 मे पासून पुढील आदेश येईपर्यंत रद्द
05205 लखनऊ-जबलपुर स्पेशल 13 मे पासून पुढील आदेश येईपर्यंत रद्द
05206 जबलपुर-लखनऊ स्पेशल 14 मे पासून पुढील आदेश येईपर्यंत रद्द
02191 जबलपुर-हरिद्वार जंक्शन फेस्टिवल स्पेशल 12 मे पासून पुढील आदेश येईपर्यंत रद्द
02192 हरिद्वार जंक्शन-जबलपुर फेस्टिवल स्पेशल 13 मे पासून पुढील आदेश येईपर्यंत रद्द
02179/02180 लखनऊ-आगरा फोर्ट-लखनऊ स्पेशल 15 मे पासून 31 मे पर्यंत रद्द
अशा प्रकारे भारतीय रेल्वेने आपल्या वरील रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे तुम्हीही या मार्गाने प्रवास करणार असाल तर रेल्वेने रद्द केलेल्या वरील गाड्यांची लिस्ट नक्की चेक करा आणि त्यानुसार प्रवास करा.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)