Chennai: भारतीय नौदल अधिकाऱ्याचा चैन्नईच्या कोवलम समुद्रात बुडून मृत्यू
भारतीय नौदलाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की लेफ्टनंट कमांडर जेआर सुरेश काल कोवलम समुद्रकिनार्यावर वाहून गेले होते आणि घटनेच्या एका दिवसानंतर शुक्रवारी त्यांचा मृतदेह केलंबक्कम येथे मिळवण्यात आला.
चेन्नई (Chennai) येथे भारतीय नौदलाच्या एका अधिकाऱ्याचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. भारतीय नौदलाचा एक अधिकारी, जो सुट्टीवर होता, परंतु गुरुवारी चेन्नईजवळील उपनगरीय समुद्रकिनाऱ्यावर बुडून मृत्यू झाला आणि आज (शुक्रवारी) त्याचा मृतदेह सापडला. भारतीय नौदलाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की लेफ्टनंट कमांडर जेआर सुरेश काल कोवलम समुद्रकिनार्यावर वाहून गेले होते आणि घटनेच्या एका दिवसानंतर शुक्रवारी त्यांचा मृतदेह केलंबक्कम येथे मिळवण्यात आला. ज्या ठिकाणी त्याचा मृतदेह सापडला ते ठिकाण घटनास्थळापासून अवघ्या 5 किमी अंतरावर आहे.
Tweet
नौदलाच्या अधिका-यांनी असेही सांगितले की लेफ्टनंट कमांडर सुरेश कोवलममध्ये आपल्या कुटुंबासह रजेवर होते. त्यांची पोस्टिंग दिल्लीत होती, मात्र ते या दिवसात रजेवर कोवलम येथे येत होते.येथे जारी केलेल्या संरक्षण प्रकाशनात म्हटले आहे की, “भारतीय नौदलाचे लेफ्टनंट कमांडर जेआर सुरेश 25 नोव्हेंबर 2021 च्या संध्याकाळी चेन्नईच्या बाहेरील कोवलम बीचवर वाहून गेले. केलंबक्कम येथे आज त्यांचा दुपारच्या सुमारास अधिकाऱ्याचा मृतदेह सापडला. (हे ही वाचा Primary Health Care in India: भारत आणि आशियाई विकास बँकेने देशातील प्राथमिक आरोग्य सेवेच्या सुधारणेसाठी 300 दसलक्ष डॉलर्स चे कर्ज मंजूर केले.)
दरम्यान, हवामान खात्याने तामिळनाडूची राजधानी चेन्नई आणि राज्याच्या इतर अनेक भागात, तिरुवल्लूर, राणीपत, वेल्लोर, तिरुवन्नमलाई, मायिलादुथुराई, नागापट्टणम, तंजावर आणि तिरुवरूर जिल्ह्यांशिवाय पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये मध्यम पावसासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. दुसरीकडे, दक्षिण भारतात कहर म्हणून बरसलेल्या ढगांनी सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत केले. अनेक दिवसांच्या संततधारेनंतर आता पाऊस शांत होण्याची अपेक्षा आहे. हवामान खात्याच्या ताज्या अपडेटनुसार, येत्या काही दिवसांत पाऊस थांबण्याची शक्यता आहे.