Indian Economy: भारताने अमेरिका आणि चीनला सोडले मागे, भारतीय अर्थव्यवस्था वेगाने जात आहे पुढे

भारताच्या या वेगाने अमेरिका, युरोप आणि चीन मागे पडले आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने कॅलेंडर वर्ष 2024 साठी भारताचा विकास दर अंदाज 6.8 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Largest Economy | Representational image (Photo Credits: pxhere)

Indian Economy:  भारतीय अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत आहे. भारताच्या या वेगाने अमेरिका, युरोप आणि चीन मागे पडले आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने कॅलेंडर वर्ष 2024 साठी भारताचा विकास दर अंदाज 6.8 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. इंटरनॅशनल मॉनेटरी फंड (IMF) ने वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुकच्या वाढीचा अंदाज जाहीर केला आहे. 2024 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था 6.8 टक्के दराने वाढेल. IMF ने 2024 मध्ये भारतासाठी 6.8 टक्के जीडीपी वाढीचा अंदाज वाढवला आहे, जो जानेवारी 2024 मध्ये जाहीर केलेल्या 6.5 टक्के अंदाजापेक्षा जास्त आहे. IMF ने 2025 च्या वाढीच्या अंदाजात कोणताही बदल केलेला नाही आणि विकास दर 6.5 टक्के अपेक्षित आहे.

 भारत पुढे जात आहे

वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक अहवाल जारी करताना, IMF ने म्हटले आहे की, भारतातील वाढ मजबूत राहील आणि GDP 2024 मध्ये 6.8 टक्के आणि 2025 मध्ये 6.5 टक्के राहण्याची अपेक्षा आहे. IMF च्या मते, देशांतर्गत मागणी आणि कार्यरत लोकसंख्येतील वाढ यामुळे भारताच्या आर्थिक वाढीमध्ये ही ताकद दिसून येत आहे. IMF ने आर्थिक वर्ष 2023-24 साठी भारताचा आर्थिक वाढीचा अंदाज 7.8 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे, जो सरकारच्या 7.6 टक्क्यांच्या अंदाजापेक्षा जास्त आहे. IMF ने 2024 मध्ये भारतातील महागाई दर 4.6 टक्के आणि 2025 मध्ये 4.2 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. IMF चा अंदाज भारतीय रिझर्व्ह बँकेच्या 4.5 टक्क्यांच्या अंदाजापेक्षा जास्त आहे. मार्च 2024 च्या जाहीर झालेल्या किरकोळ महागाईच्या आकडेवारीनुसार, अन्नधान्य महागाई दर 8.52 टक्के असला तरी किरकोळ महागाईचा दर 4.85 टक्क्यांवर आला आहे.