Indian Coffee Exports Soar: भारताची कॉफी निर्यात 55 टक्क्यांनी वाढली, काय आहे जागतिक मागणी वाढल्याचा फायदा, जाणून घ्या

ही वाढ होण्याचे कारण म्हणजे जगभरात भारतीय कॉफीची वाढलेली मागणी. भारतीय कॉफी बोर्डाने जारी केलेल्या आकडेवारीत असे म्हटले आहे की, एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत भारताकडून 2.2 लाख टन कॉफीची निर्यात करण्यात आली आहे.

Indian Coffee Exports Soar:

Indian Coffee Exports Soar: भारताची कॉफी निर्यात चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत वार्षिक 55 टक्क्यांनी वाढून 7,771.88 कोटी रुपये झाली आहे, जी गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत 4,956 कोटी रुपये होती. ही वाढ होण्याचे कारण म्हणजे जगभरात भारतीय कॉफीची वाढलेली मागणी. भारतीय कॉफी बोर्डाने जारी केलेल्या आकडेवारीत असे म्हटले आहे की, एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत भारताकडून 2.2 लाख टन कॉफीची निर्यात करण्यात आली आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत हा आकडा 1.91 लाख टन होता, यावरून गेल्या वर्षभरात हे प्रमाण 15 टक्क्यांनी वाढल्याचे दिसून येते. अपेक्षित युरोपीय निर्यात नियमांदरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कॉफीच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत. कॉफी खरेदीदार भारतीय कॉफीसाठी सरासरी 352 रुपये प्रति किलो दर देत आहेत, जे पूर्वी 259 रुपये प्रति किलो होते.

भारताने सर्वाधिक कॉफी इटलीला निर्यात केली आहे. देशाच्या कॉफी निर्यातीत इटलीचा वाटा 20 टक्के आहे. यानंतर, जर्मनी, रशिया, UAE आणि बेल्जियमचा एकत्रित हिस्सा 45 टक्के आहे. 2023-24 पीक वर्षात भारतातील कॉफीचे उत्पादन सुमारे 3.6 लाख मेट्रिक टन होते.

2021-22 मध्ये, भारतीय कॉफीची निर्यात 2020-21 मधील मागील वर्षाच्या तुलनेत 38 टक्क्यांनी अधिक $1.016 अब्ज इतकी होती. 2021-22 मध्ये जागतिक कॉफी निर्यातीत सुमारे 6 टक्के वाटा असलेला भारत हा जगातील पाचवा सर्वात मोठा कॉफी निर्यातदार होता. भारतातील सुमारे 70 टक्के कॉफी उत्पादन कर्नाटकात होते.

भारताच्या कॉफी उत्पादनात केरळचा वाटा 20 टक्के आहे, ज्यामुळे ते देशातील दुसरे सर्वात मोठे कॉफी उत्पादक राज्य बनले आहे. 5.7 टक्के वाटा घेऊन तामिळनाडू तिसऱ्या स्थानावर आहे.