भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव घटला, मी त्यांची मदत करु इच्छितो-डोनाल्ड ट्रम्प
भारत आणि पाकिस्तान (India And Pakistan) दरम्यान मागील दोन आठवड्यापूर्वीच्या तुलनेत आता तणाव कमी झाल्याचे वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (donald Trump) यांनी केले आहे
सरकारने जम्मू काश्मीरमधून (Jammu Kashmir) अनुच्छेद ३७० (Artical 370) रद्द केल्यामुळे संबधित भागात अशांतता पसरली होती. भारत आणि पाकिस्तान (India And Pakistan) दरम्यान मागील दोन आठवड्यापूर्वीच्या तुलनेत आता तणाव कमी झाल्याचे वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (donald Trump) यांनी केले आहे. जुलैमध्ये पाक पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी (America) अमेरिका दौऱ्यादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीर मुद्द्यावर दोन्ही देशांदरम्यान मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेवून मध्यस्थी करण्याचा विचार त्यांच्या समोर मांडला होता. या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी भारत आणि पाक दरम्यान कोणत्याही मुद्द्यावर तिसऱ्या देशाच्या हस्तक्षेपाची गरज नसल्याचे स्पष्ट केले होते.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या कित्येक वर्षापासून जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरुन वाद सुरु आहे. त्याचबरोबर भारताने जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा मिळवून देणारे अनुच्छेद ३७० रद्द केल्यामुळे हा मुद्दा आणखी पेटला आहे. परंतु, 2 आठवड्यापूर्वीच्या तुलनेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाद घटला आहे. तसेच दोन्ही देशाला काही हरकत नसेल तर, आम्ही मध्यस्थी करायला तयार आहे, अशी इच्छा डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे. सोमवारी ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये माध्यमांशी बोलताना म्हणाले की, मला दोन्ही देशांची साथ चांगली वाटते. जर त्यांना आवडले तर, मी त्यांची मदत करु इच्छितो. हे देखील वाचा-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सोशल मीडियावर तब्बल 109 दशलक्ष फॉलोअर्स; ट्विटरवर बराक ओबामा, डोनाल्ड ट्रम्प याच्यानंतर जगात तिसरा क्रमांक
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानदरम्यान मध्यस्थीसाठी अनेक वेळा आपली इच्छा जाहीर केली आहे. अनेक वर्षापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात जम्मू-काश्मीर यामुद्द्यावरुन वाद निर्माण होत आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाद पूर्णपणे कधी नष्ट होईल, याकडे सर्व भारतीयांचे लक्ष वेधले गेले आहे.