राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक Mohan Bhagwat यांच्या सुरक्षेत वाढ; पंतप्रधान मोदी, अमित शाहांच्या दर्जाची सुरक्षा
मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांना आधी झेड प्लस दर्जाची सुरक्षा होती. त्यात वाढ करून ASL म्हणजेच एडवांस सेक्युरिटी लायझनिंग सुरक्षा पुरवण्यात आली आहे.
Mohan Bhagwat: केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, डॉ. मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांना आधी झेड प्लस दर्जाची सुरक्षा होती. त्यात वाढ करून ASL म्हणजेच एडवांस सेक्युरिटी लायझनिंग सुरक्षा पुरवण्यात आली आहे. ही सुरक्षा फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाच देण्यात येते. डॉ. मोहन भागवत यांची अचानक सुरक्षा का वाढवण्यात आली? याबद्दल सवाल उपस्थित केले जात आहे. काही दिवसांपूर्वी केंद्राने शरद पवार यांची देखील सुरक्षा वाढवली होती.
त्यामुळे केंद्र सरकार अचानक सुरक्षा (Security) वाढवण्याचा का निर्णय घेतंय? असा प्रश्न अनेकांना पडलाय. मोहन भागवत यांना कोणाची भीती आहे. त्यांना पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्याइतकी सुरक्षा देण्याचं कारण काय? असा सवालही अनेकजण उपस्थित करीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्रालयाने मोहन भागवत यांच्या सध्याच्या सुरक्षेची समीक्षा केली. त्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला.
मोहन भागवत काही मुस्लिम संघटनांच्या निशाणावर असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे डॉक्टर मोहन भागवत यांच्या राहण्याच्या व्यवस्थेबाबत, प्रवास, भेटी आणि बैठकांच्या स्थळी अतिशय कडक सुरक्षा प्रोटोकॉल पाळण्यात येतील. त्याचबरोबर ASL अंतर्गत, संरक्षित व्यक्तीच्या संरक्षणाशी संबंधित जिल्हा प्रशासन, पोलीस, आरोग्य आणि इतर विभाग यासारख्या स्थानिक संस्थांचा सहभाग अनिवार्य आहे. त्यात बहुस्तरीय सुरक्षा गराड्याचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले. हेलिकॉप्टर प्रवासाला केवळ खास डिझाइन केलेल्या हेलिकॉप्टरमध्येच परवानगी दिली जाईल.