Cyclone Biparjoy Update: येत्या 24 तासांत ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ वेग पकडणार; कुठे होणार परिणाम? जाणून घ्या
खबरदारीचा उपाय म्हणून तिथल बीच 14 जूनपर्यंत पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे.
Cyclone Biparjoy Update: चक्रीवादळ 'बिपरजॉय' (Biparjoy) पुढील 24 तासांत आणखी तीव्र होऊन उत्तर-ईशान्येकडे सरकण्याची दाट शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) यासंदर्भात इशारा दिला आहे. 9 जून रोजी सकाळी 11:30 वाजता 16.0N आणि लांब 67.4E जवळ अरबी समुद्रावर 'BIPERJOY' पुढील 24 तासांत आणखी तीव्र होऊन उत्तर-ईशान्येकडे सरकण्याची दाट शक्यता आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे अरबी समुद्र किनाऱ्यावरील वलसाडमधील तिथल समुद्रकिनाऱ्यावर उंच लाटा उसळल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून तिथल बीच 14 जूनपर्यंत पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे.
वलसाड तहसीलदार टी.सी.पटेल यांनी सांगितलं की, आम्ही मच्छिमारांना समुद्रात जाऊ नये असे सांगितले आणि ते सर्व परत आले आहेत. गरज भासल्यास लोकांना गावात हलवले जाईल. त्यांच्यासाठी निवारागृहे तयार करण्यात आली आहेत. आम्ही तिथल बीच 14 जूनपर्यंत पर्यटकांसाठी बंद ठेवला आहे. (हेही वाचा - Heavy Rains in Guwahati: गुवाहाटीमध्ये मुसळधार पावसानंतर शहरात पाणी साचल्याने नागरिकांच्या अडचणीत वाढ)
IMD चा मच्छिमारांना सल्ला
तत्पूर्वी, आयएमडीने पुढील 36 तासांत ‘बिपोर्जॉय’ चक्रीवादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली होती आणि मच्छिमारांनी केरळ, कर्नाटक आणि लक्षद्वीपच्या किनारपट्टीवरील समुद्रात जाऊ नये असा सल्लाही दिला होता.
या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट -
केरळमधील तिरुअनंतपुरम, कोल्लम, पठाणमथिट्टा, अलाप्पुझा, कोट्टायम, इडुक्की, कोझिकोड आणि कन्नूर जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे, IMD ने 10 जून रोजी समुद्राची स्थिती उग्र आणि 11 ते 14 जून दरम्यान खराब ते अत्यंत खराब राहण्याचा अंदाज वर्तवला होता.