Hyderabad Murder Case: हैदराबादमध्ये आईचा लग्नाला होता विरोध, प्रियकराच्या मदतीने मुलीने केला खून
सोमवारी रात्री चिंतलमेट, राजेंद्रनगर (Rajendranagar) येथील मुलीच्या घरी ही घटना घडली आहे. कथितरित्या मुलगी तिच्या आईला तिच्या प्रियकराशी लग्न करण्यास नकार दिल्याबद्दल नाराज होती
हैदराबादमधील (Hyderabad) एका मुलीने कथितरित्या आपल्या प्रियकराची (Boyfriend) मदत घेऊन तिच्या आईची हत्या (Murder) केली आहे. सोमवारी रात्री चिंतलमेट, राजेंद्रनगर (Rajendranagar) येथील मुलीच्या घरी ही घटना घडली आहे. कथितरित्या मुलगी तिच्या आईला तिच्या प्रियकराशी लग्न करण्यास नकार दिल्याबद्दल नाराज होती. यादम्मा असे मृत महिलेचे नाव आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या एका व्यक्तीशी यादम्माचा विवाह एका मजुराशी झाला होता. मृताच्या 19 वर्षीय मुलीचे नाव नंदिनी असे आहे. तीने शाळा मधेच सोडली होती. त्यानंतर नंदिनी राम कुमारच्या प्रेमात होती. रिपोर्टनुसार, कुमार 19 वर्षांचा आहे आणि बेरोजगार आहे. ती कुमारला गुप्तपणे भेटायची पण अलीकडेच तिच्या आईवडिलांकडे त्याच्याशी लग्न करण्याची परवानगी मागितली होती पण त्यांनी नकार दिला.
यादम्मानी नंतर नंदिनीला कुमारशी गुपचूप लग्न केल्याबद्दल फटकारले होते. त्यामुळे त्यांच्यात वाद निर्माण झाले होते.सोमवारी, नंदिनी कुमारसोबत असताना यादम्मा तिच्या घरी परत आली आणि तिला फटकारले. नंतर नंदिनीने कुमारला घटनेची माहिती दिली आणि त्यांनी यादम्माच्या हत्येची योजना आखली. हेही वाचा Navi Mumbai Online Fraud: नवी मुंबईमध्ये घर भाड्याने घेण्याच्या बहाण्याने 45 वर्षीय व्यक्तीला 99 हजारांचा ऑनलाइन गंडा, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
योजनेनुसार, कुमार घरात शिरला आणि दोन किशोरांनी यादम्माचा गळा चिरून खून केला, असे टाइम्स ऑफ इंडियाने म्हटले आहे. यादम्माचा पती यदाया रात्री घरी परतला आणि तिचा मृतदेह पाहिला तेव्हा ही घटना उघडकीस आली. त्याने पोलिसांना माहिती दिली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी मंगळवारी आरोपीला ताब्यात घेतले आहे.