Ghaziabad Road Rage Case: गाझियाबादमध्ये रोड रेजची आणखी एक घटना, भरधाव मोटारसायकलने धडक दिल्यानंतर पीडित व्यक्तीला बेदम मारहाण

व्हिडिओ फुटेजमध्ये पीडित व्यक्तीला एका वेगवान मोटारसायकलने धडक दिली आणि नंतर त्याला मारहाण करण्यात आली.

Ghaziabad Road Rage Case (PC - Twitter)

Ghaziabad Road Rage Case: उत्तर प्रदेशातील गाझियाबाद (Ghaziabad) जिल्ह्यात रोड रेज (Road Rage) च्या आणखी एका घटनेत गाझियाबादमध्ये एका व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. व्हिडिओ फुटेजमध्ये पीडित व्यक्तीला एका वेगवान मोटारसायकलने धडक दिली आणि नंतर त्याला मारहाण करण्यात आली. ही घटना 25 ऑक्टोबर रोजी घडली. पोलिसांनी एफआयआर दाखल केला असून गोविंद या आरोपीला अटक करण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत.

बादल असे पीडित व्यक्तीचे नाव असून तो गाझियाबादमधील लोनी येथील रहिवासी आहे. पीडित व्यक्तीने सांगितले की, 25 ऑक्टोबरच्या रात्री मी घराकडे जात होतो. गोविंद नावाचा माणूस त्याच्या बुलेट मोटरसायकलवरून मागून आला आणि त्याने मला जोरात धडक दिली. मी खाली पडल्यानंतर त्याने मला धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. मी बेशुद्ध पडलो. त्याने मला मारण्याचा प्रयत्न केला. पण वेळेवर एका व्यक्तीने हस्तक्षेप केला. (हेही वाचा - Shocking! दारूच्या नशेत पतीने भावांसोबत आपल्याच पत्नीवर केला सामूहिक बलात्कार; पीडितेच्या डोक्यावरील केसही कापले)

पीडित व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, गोविंदसोबत जुना वाद होता, मात्र तडजोड झाली होती. या वादात तडजोड होऊनही गोविंद हा त्याचा पाठलाग करत होता. त्याने त्याच्या भरधाव दुचाकीने बादलला जखमी करण्याचा प्रयत्न केला. बादल म्हणाला की, आपण पोलिसांशी संपर्क साधला होता. परंतु अद्याप या प्रकरणात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. पोलिसांनी एफआयआरमध्ये लुटीची कलमे लावली आहेत, परंतु गोविंदने त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, बादल नावाच्या पीडित व्यक्तीने तक्रार दिल्यानंतर एफआयआर दाखल करण्यात आल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. आरोपी अजय उर्फ गोविंदला पकडण्यासाठी पथके तयार करण्यात आली असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.