Crime: घरातील पाणीपुरवठा बंद केल्याने झालेला वाद पोहोचला शिगेला, रागाच्या भरात पतीने केली पत्नीसह मुलीची हत्या
संजय असे आरोपीचे नाव असून तो नंदग्राम (Nandagram) येथील रहिवासी आहे. गाझियाबादला बसमधून पळून जाण्याच्या प्रयत्नात त्याला पकडण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
घरगुती वादातून (Domestic disputes) पत्नी आणि मुलीची फावड्याने हत्या (Murder) केल्याप्रकरणी गाझियाबाद पोलिसांनी (Ghaziabad Police) शुक्रवारी एका व्यक्तीला अटक (Arrested) केली. संजय असे आरोपीचे नाव असून तो नंदग्राम (Nandagram) येथील रहिवासी आहे. गाझियाबादला बसमधून पळून जाण्याच्या प्रयत्नात त्याला पकडण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी सांगितले की, त्यांना शुक्रवारी दुपारी 12.30 च्या सुमारास नंदग्राममधील एका घरात दोन मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली. ते घटनास्थळी पोहोचले असता त्यांनी रेखा आणि ताशू अशी मृतांची ओळख पटवली. परिसरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. हेही वाचा Delhi Sexual Assault Case: दिल्लीत 11 वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार, दोन आठवड्यांनंतर मृत्यूशी झुंज ठरली अपयशी, दोघांना अटक
गाझियाबादचे एसएसपी मुनिराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितांना फावड्याने वार करण्यात आले. दोघांमध्ये वारंवार भांडणे होत होती. काल रात्री पत्नीने पाणीपुरवठा बंद केल्याने वाद झाला. रागाच्या भरात त्याने पत्नी आणि मुलीची हत्या केली. पत्नी तिच्या खोलीत मृतावस्थेत आढळली तर ताशूचा मृतदेह गच्चीवर आढळला.
एसएसपी पुढे म्हणाले, आम्ही या प्रकरणाचा अधिक तपास करू आणि हत्येमागील कारणे शोधू. योग्य ती कायदेशीर कारवाई केली जात आहे. आरोपीचा 18 वर्षांचा मुलगा घटनास्थळी सापडला नसून त्याचा ठावठिकाणा जाणून घेण्यासाठी संजयची चौकशी करण्यात येत असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
(The above story first appeared on LatestLY on Oct 01, 2022 04:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

