भारतीय विंग कमांडर अभिनंदन याला स्वातंत्र्यदिनी 'वीरचक्र' देऊन करणार विशेष सन्मान
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान (Abhinandan Varthaman)यांना 'वीर चक्र' (Vir Chakra) देऊन गौरविण्यात येणार आहे. 14 फेब्रुवारी 2019 मध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्याच्या विरोधान पाकिस्तानशी दोन हात करत असताना अभिनंदन पाकिस्तानच्या तावडीत सापडले होते. त्यानंतर भारत सरकारच्या सततच्या पाठपुराव्यामुळे तब्बल 60 दिवसांनी पाकिस्तानने त्यांना आपल्या मायदेशी परत पाठवले. त्यांच्या या खडतर प्रवासाला सलाम करण्यासाठी भारत सरकार स्वातंत्र्यदिनानिमित्त (Independence Day) त्यांना वीर चक्र बहाल करणार आहे.
पुलवामा हल्ल्यानंतर (Pulwama Attack) पाकिस्तानच्या बालाकोट (Balakot) मधील दहशतवाद्यांच्या तळावर भारतीय सैन्याने एअर स्ट्राईक (Balakot Airstrike) केला होता. यावेळी निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अभिनंदन यांनी पाकिस्तानचं F-16 विमान पाडलं होतं. त्यांच्या एअर स्ट्राईकने पाकिस्तानला चोख उत्तर देण्यात आले होते. मात्र चकमकीत विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे पाकिस्तानच्या तावडीत सापडले.
याशिवाय दहशतवाद्यांच्या तळावर बॉम्बहल्ले करणाऱ्या ‘मिराज 2000 ‘च्या वैमानिकांचाही वायुसेनेचं पदक देऊन गौरव होण्याची शक्यता आहे.
वीर चक्र हा भारतीय युद्ध काळात दिला जाणारा तिसरा सर्वोच्च सन्मान आहे. कारगिल युद्धानंतर (Kargil War 1999) 2000 मध्ये अखेरचं वीर चक्र देण्यात आलं होतं. त्यानंतर एकविसाव्या शतकात कोणत्याही जवानाचा ‘वीर चक्र’ने गौरव झालेला नाही.