LPG Cylinder Price: एलपीजी सिलिंडरच्या दरात मोठी कपात; किती रुपयांनी स्वस्त झाला सिलेंडर? जाणून घ्या

पूर्वी हा सिलिंडर 1856.50 रुपयांचा होता. मात्र, घरगुती गॅस सिलिंडर पूर्वीप्रमाणेच दरात मिळणार आहे.

LPG-Cylinder (फोटो सौजन्य -Wikimedia Commons)

LPG Cylinder Price: आज जून महिना सुरू झाला असून पहिल्याच दिवशी लोकांना दिलासादायक बातमी मिळाली आहे. महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी सिलेंडरच्या किमतीत (LPG Cylinder Price) मोठी कपात होताना दिसत आहे. 1 जून रोजी एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत तेल कंपन्यांनी दिलासा दिला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी (OMCs) जाहीर केलेल्या किमतीनुसार, व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 83 रुपयांनी कमी झाली आहे. 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरसाठी आता 1773 रुपये मोजावे लागणार आहेत. पूर्वी हा सिलिंडर 1856.50 रुपयांचा होता. मात्र, घरगुती गॅस सिलिंडर पूर्वीप्रमाणेच दरात मिळणार आहे.

याआधीही व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 172 रुपयांनी कमी करण्यात आली होती. देशाची राजधानी दिल्लीत व्यावसायिक गॅसची किंमत 83.5 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. त्यानंतर त्याची नवीन किंमत रु.1773 झाली आहे. गेल्या महिन्यापर्यंत व्यावसायिक गॅसचा दर 1856.50 रुपये प्रति सिलेंडर होता. त्याचबरोबर घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 1103 कायम आहे. (हेही वाचा - अँटिलियामधून आनंदाची बातमी! Mukesh Ambani पुन्हा एकदा झाले आजोबा, Akash व Shloka यांना कन्यारत्न)

गेल्या अनेक महिन्यांपासून घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. गेल्या वेळी मार्चमध्येच बदल दिसून आला होता. तेव्हापासून कोणताही बदल झालेला नाही.

एटीएफच्या किमतीत मोठी कपात

एलपीजीशिवाय तेल कंपन्यांनीही एटीएफच्या किमतीत मोठी कपात केली आहे. एक किलोलिटरचा भाव 6600 रुपयांपर्यंत खाली आला आहे. दिल्लीतील ATF ची किंमत आधीच्या 95935.34 रुपयांवरून 89,303.09 रुपयांवर आली आहे. यापूर्वी मुंबईत किंमत रु.89348.60 प्रति किलोलीटर होती, जी आता रु.83,413.96 प्रति किलोलीटर दराने उपलब्ध होईल. कोलकात्यात हा दर 95,963.95 रुपये प्रति किलोलीटर आणि चेन्नईमध्ये 93,041.33 रुपये प्रति किलोलिटर इतका खाली आला आहे.