Holi 2020: पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद सह दिग्गजांनी दिल्या होळीच्या शुभेच्छा!

काल रात्री होलिका दहन झाल्यानंतर आज धुळवडीचा आनंद लूटण्यासाठी आबालवृद्ध सज्ज झाले आहेत.

Holi| Photo Credits: Facebook Pixabay

Dhulwad 2020:   देशभरात आज (10मार्च) होळीच्या सणाची धामधूम आहे. काल रात्री होलिका दहन झाल्यानंतर आज धुळवडीचा आनंद लूटण्यासाठी आबालवृद्ध सज्ज झाले आहेत. दरम्यान यंदा होळीच्या सणावर कोरोना व्हायरसचं सावट असल्याने सार्वजनिक स्वरूपात होळी, धुळवड साजरी करण्याऐवजी कौटुंबिक स्वरूपात होळी खेळण्याचं आवाहन केलं जात आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षी खबरदारीचा उपाय म्हणून 'होली मिलन सेलिब्रेशन' पासून दूर राहण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र आज त्यांनी सोशल मीडीयाच्या माध्यमातून खास ट्वीट करत भारतीयांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. धुळवड म्हणजेच धुलिवंदनाचा सण हा निसर्गात जसे रंगांची उधळून करून वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल देतो तसाच तो आपण रंगांची, पाण्याची उधळण करून साजरा करतो. मग पहा पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी होळीच्या शुभेच्छा देताना काय म्हटलंय? Dhulivandan 2020 Wishes: धुलिवंदनाच्या शुभेच्छा मराठमोळे Messages, Greetings, Images, GIFs आणि WhatsApp Stickers च्या माध्यमातून देऊन साजरा करा वसंतोत्सवाचा सण!

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्वीट

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं ट्वीट

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं ट्वीट

फाल्गुन पौर्णिमेपासून पंचमी पर्यत होळीचा सण साजरा केला जातो. यामध्ये होलिका दहन, धुळवड आणि रंगपंचमी साजरी केली जाते. एकमेकांवर रंगांची उधळून करून हा आनंदाचा सण साजरा करण्याची प्रथा आहे. देशभरात होळी विविध नावांनी ओळखली जाते. त्याच्याशी निगडित प्रथा देखील वेगळ्या आहेत. उत्तर भारतामध्ये होळीच्या सणाची विशेष धूम असते. या सणाच्या निमित्ताने अनेक गोडाच्या पदार्थांची, भांग,थंडाईची रेलचेल असते.