Helicopter Emergency Landing on Uttarakhand Road: थेट रस्त्यावर हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग; कारचा चक्काचूर, उत्तराखंडमधील घटना (Video)

रुद्रप्रयाग जिल्ह्यात एका हेलिकॉप्टरचे रस्त्यावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. सुदैवाने, यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Helicopter Emergency Landing on Uttarakhand Road: उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यात एक मोठा अपघात थोडक्यात टळला. रस्त्याच्या मधोमध एक खाजगी हेलिकॉप्टरचे लँडिंग करण्यात आले. ज्यात त्या हेलिकॉप्टरच्या मागच्या भागामुळे एका कारचे मोठे नुकसान झाले. गुप्तकाशी परिसरात ही घटना घडली. पायलटला तांत्रिक बिघाड लक्षात आल्यानंतर त्याला आपत्कालीन लँडिंग करावे लागले. हेलिकॉप्टरमधील सर्व प्रवासी, ज्यामध्ये पायलटचाही समावेश होता. सुदैवाने यात कोणलाही दुखापत झाली नाही. याशिवाय, हेलिकॉप्टरच्या मागील बाजूने ज्या कारला टक्कर झाली त्याचे नुकसान झाले आहे. अपघातावेळी सुदैवाने कारमध्ये कोणीही नव्हते.

तांत्रिक बिघाडामुळे आपत्कालीन लँडिंग

घटनेनंतर वैद्यकीय आणि आपत्कालीन कर्मचाऱ्यांनी हेलिकॉप्टरकडे धाव घेतली आणि त्यातील लोकांना बाहेर काढले. हेलिकॉप्टर क्रेस्टेल एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेडचे ​​होते आणि ते भाविकांना सिरसीहून केदारनाथ धाम मंदिराकडे घेऊन जात होते. बिघाडामुळे, खबरदारी म्हणून हेलिकॉप्टर जवळच्या हेलिपॅडऐवजी रस्त्यावर उतरवावे लागले.

यापूर्वीही अपघात झाला

यापूर्वी ८ मे रोजी उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील भागीरथी नदीजवळ एका खाजगी हेलिकॉप्टरचे लँडिंग करण्यात आले होते. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आणि दोघे जण जखमी झाले होते. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या मते, एरोट्रान्स सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडद्वारे चालवले जाणारे हे हेलिकॉप्टर 200 ते 250 मीटर खोल दरीत उतरले. हे हेलिकॉप्टर देहरादूनमधील सहस्त्रधारा हेलिपॅडवरून उड्डाण घेऊन यमुनोत्री मंदिराजवळील खरसाली हेलिपॅडकडे रवाना झाले होते. प्रवाशांपैकी चार जण मुंबईचे आणि दोन आंध्र प्रदेशचे होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement