Heavy Rains: तेलगंणा आणि आंध्र प्रदेशात मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत, रेल्वे सेवा खोळंबळली
त्यामुळे दोन्ही राज्यामध्ये रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे, परिणामी अनेक गाड्या थांबल्या, रद्द केल्या आणि वळवण्यात आल्या, असे अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले.
Heavy Rains: तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे दोन्ही राज्यामध्ये रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे, परिणामी अनेक गाड्या थांबल्या, रद्द केल्या आणि वळवण्यात आल्या, असे अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले. (हेही वाचा-भारतामध्ये यंदा ऑगस्ट महिन्यात15.7% सरासरी पेक्षा अधिक पाऊस; IMD ची माहिती)
विजयवाडा काझीपेट मार्गावर २४ गाड्या थांबवण्यात आला होत्या, कारण काही ठिकाणी तलाव आणि नाल्यांच्या पाण्याने तुडुंब भरला होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, विजयवाडा विभागात 30 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुराच्या पाण्यामुळे तेलंगणातील महबुबाबाद जिल्ह्यात काही ठिकाणी रेल्वे ट्रॅकचे नुकसान झाले आहे. महबूबाबादजवळील अयोध्या गावात टाकी फुटल्याने रेल्वे रुळाला तडा गेला. त्यामुळे दक्षिण मध्य रेल्वेला विजयवाडा-काझीपेठ मार्गावरील गाड्या रद्द कराव्या लागल्या.
सततच्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाली आहे. केसमुद्रम ते इंतिकने दरम्यान रेल्वे ट्रॅकचेही नुकसान झाले आहे. महाबूबनगर-विशाखापट्टणम एक्स्प्रेस पांडिलापल्ली येथे चार तास थांबवण्यात आली होती कारण ट्रॅकवर पाणी भरले होते. मुसळधार पावसात अनेक प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वेच्या अनेक गाड्या वळवण्यात आल्या आहेत अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.