Gujarat Businessman Becomes Monk :बापरे! आयुष्यभर कमावलेली २०० कोटींची संपत्ती केली दान; गुजरातमधील उद्योगपतीने सपत्निक स्विकारले भिक्षुत्व

भौतिक सुखांचा त्याग करून त्याने आणि त्याच्या पत्नीने भिक्षुत्व स्वीकारल्याची बाब समोर आली आहे.

Photo Credit - X

Gujarat Businessman Becomes Monk : एखाद्या व्यक्तीला भौतिक सुखांचा मोह नसतो. त्यामुळे त्याने त्याच्या आयुष्यात केलेल्या त्यागाच्या अनेक कथा आपण एकल्या असतील. अशीच एक घटना गुजरातमध्ये घडली आहे. गुजरातमध्ये एक कोट्यधीश उद्योगपती आणि त्याच्या पत्नीने त्यांची तब्बल २०० कोटींची संपत्ती दान करून भिक्षुत्व स्वीकारले(Businessman Becomes Monk) असल्याचीबाब समोर आली आहे. 22 एप्रिल रोजी ते भिक्षुत्वाची प्रतिज्ञा घेणार आहेत. विशेष म्हणजे त्यांना दोन मुले आहेत. या दाम्पत्याआधीच २०२२ मध्ये त्यांच्या मुलांनी भिक्षुत्व स्वीकारले होते. भावेश भंडारी असे त्या उद्योगपतीचे नाव आहे. त्यांच्या 9 वर्षांच्या मुलीने आणि 16 वर्षाच्या मुलाने 2022 मध्ये भिक्षुत्व स्वीकारले होते.

त्यानिमित्त, भावेश भंडारी आणि त्याच्या पत्नीने चार किलोमीटरपर्यंत मिरवणूक काढली होती. मरवणूकी दरम्यान, त्यांनी त्यांच्याजवळील मौल्यवान वस्तू दान केल्या. नुकताच त्यांच्या मिरवणूकीचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात ते पैसे तेथे जमलेल्या लोकांवर उधळताना दिसत आहेत. जोडपे मोबाईल फोन आणि एअर कंडिशनरसह त्यांचे सामान दान करताना दिसत आहे.

कसे जगतात जीवन: भिक्षुत्वाची प्रतिज्ञा घेतल्यानंतर कोणतीही भौतिक सुखांची वस्तू त्यांना स्वत: जवळ ठेवण्याची परवानगी नसते. जैन परंपरेनुसार, त्यांना फक्त दोन पांढरे वस्त्र परिधान करण्यासाठी दिले जातात. भिक्षा मागण्यासाठी सामान दिले जाते.

या आधी 2023 मध्ये, गुजरातमधील कोट्यधीश हिरे व्यापारी आणि त्यांच्या पत्नीने त्यांच्या 12 वर्षांच्या मुलाने भिक्षुत्व स्वीकारल्यानंतर स्वत: भिक्षुक झाले होते. 2017 मध्ये, मध्य प्रदेशमधील सुमित राठौर आणि त्याची पत्नी अनामिका यांनी त्यांची 100 कोटींची सपत्ती दान केली होती आणि भिक्षुकत्व स्विकारले होते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif