Coronavirus: कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी सरकारकडून 40 हजारांहून अधिक व्हेंटिलेटरची मागणी; आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची माहिती
यासंदर्भात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने माहिती दिली आहे. याशिवाय नोएडा येथील आगवा हेल्थकेअरला एका महिन्यात 10,000 व्हेंटिलेटर तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांचा पुरवठा एप्रिलच्या दुसर्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. तसेच भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेडला स्थानिक उत्पादकांच्या सहकार्याने पुढील दोन महिन्यांत 30,000 व्हेंटिलेटर तयार करण्यास सांगण्यात आले आहे. कोरोना विरोधातील लढा यशस्वी करण्यासाठी आणि कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी सरकार सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे.
Coronavirus: संरक्षण संशोधन आणि विकास संघटना पुढील आठवड्यात दररोज 20 हजार एन-99 मास्क तयार करण्यास प्रारंभ करणार आहे. यासंदर्भात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने माहिती दिली आहे. याशिवाय नोएडा येथील आगवा हेल्थकेअरला एका महिन्यात 10,000 व्हेंटिलेटर तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांचा पुरवठा एप्रिलच्या दुसर्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. तसेच भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेडला स्थानिक उत्पादकांच्या सहकार्याने पुढील दोन महिन्यांत 30,000 व्हेंटिलेटर तयार करण्यास सांगण्यात आले आहे. कोरोना विरोधातील लढा यशस्वी करण्यासाठी आणि कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी सरकार सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे.
दरम्यान, देशातील काही उत्पादकांकडून दररोज 50,000 एन 95 मास्क तयार करण्यात येत आहेत. मागील दोन दिवसांत सरकारकडून 5 लाख मास्क वाटण्यात आले आहेत. तसेच सिंगापूर आधारित प्लॅटफॉर्मवर एमईएमार्फत 10 लाख पीपीई किटची ऑर्डर देण्यात आली असून लवकरच त्याचा पुरवठा करण्यात येणार आहे.
सध्या देशातील रुग्णालयांमध्ये 3 लाख 34 हजार पीपीई कव्हरेलल्स उपलब्ध आहेत. 4 एप्रिलपर्यंत परदेशातून आणखी 3 लाख पीपीईची मागणी करण्यात आली आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारासाठी आरोग्य मंत्रालयाकडून वैद्यकिय साधनाची खरेदी करण्यात येत आहे. देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या विचारात घेऊन सरकार वैद्यकिय उपकरणांचा पुरवठा वाढवत आहे. सध्या देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 1 हजार हून जास्त झाली असून आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू झाला आहे.