Gautam Adani 2 अब्ज डॉलरच्या लाचखोरी प्रकरणात अडकले, अमेरिकेने केले गंभीर आरोप, अटक वॉरंट जारी
वृत्तानुसार, अदानी समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष गौतम अदानी आणि इतर सात जणांवर $2 अब्ज डॉलरची फसवणूक आणि लाचखोरी घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप आहे.
Gautam Adani Caught In $2 Billion Fraud and Bribery Case: ज्येष्ठ उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेतील कथित 250 दशलक्ष डॉलर्सची फसवणूक आणि लाचखोरी प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप आहे. वृत्तानुसार, अदानी समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष गौतम अदानी आणि इतर सात जणांवर $2 अब्ज डॉलरची फसवणूक आणि लाचखोरी घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप आहे. सौरऊर्जा करार जिंकण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना 265 दशलक्ष डॉलर्स लाच दिल्याचा आरोप अदानी गटावर आहे, ज्यामुळे अदानी समूहाने अब्जावधी डॉलर्सचा नफा कमावला आहे. हे देखील वाचा: Google Doodle Today: चंद्र चक्राविषयी वापरकर्त्यांना माहिती देण्यासाठी Google ने बनवले खास Doodle
अदानी आणि त्याच्या सहकाऱ्यांवर यूएस फॉरेन करप्ट प्रॅक्टिसेस ॲक्ट अंतर्गत $3 अब्ज पेक्षा जास्त किमतीचे कर्ज आणि रोख मिळवण्यासाठी खोटी माहिती दिल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. फिर्यादींचा दावा आहे ,की कटकर्त्यांनी अदानींसाठी "न्यूमेरो युनो" आणि "द बिग मॅन" अशी कोड नावे वापरली आहेत. अदानी, त्यांचा पुतण्या सागर अदानी आणि इतरांवर अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.