Gandhinagar Shocker: चुलत भावासोबत लग्न करण्याची इच्छा; लग्नाच्या 4 दिवसातच केली पतीची हत्या; महिला अटकेत

भाविक या नवविवाहित तरूणाचा लग्नाच्या अवघ्या चार दिवसांतच अपहरण करून पत्नीकडून खून करण्यात आला.

Death प्रतिकात्मक फोटो Photo Credit- X

Gandhinagar Shocker: गुजरातमधील (Gujarat) गांधीनगर येथे लग्नाच्या अवघ्या चार दिवसांत एका तरूणाचे अपहरण करून त्याची हत्या (Murder)करण्यात आली. त्याच्या हत्येचे पूर्ण प्लॅनींग त्याची पत्नी पायल हिने रचले होते. शनिवारी ही घटना उघडकीस आली. पायलचे चुलत भाऊ कल्पेशवर प्रेम होते. त्यामुळे तिने पतीची हत्या केल्याचे समोर आले आहे. या खूनात तिने कल्पेश आणि दोन साथीदाराची मदत घेतली होती. अहमदाबादचा रहिवासी असलेल्या भाविकने गेल्या आठवड्यात गांधीनगर येथील पायलशी लग्न केले. (Mumbai Shocker: चायनीज बनवण्याच्या मशिनमध्ये अडकून मजुराचा मृत्यू, मुंबईतील दादर येथील घटनेने कंपनीत खळबळ)

शनिवारी भाविक पायलला तिच्या पालकांच्या घरून घेण्यासाठी निघून गेला पण तो आलाच नाही, असे इंडिया टुडेने वृत्तात म्हटेले आहे. पायलच्या वडिलांनी भाविकच्या कुटुंबाला फोन केला. त्यांनी विचारपूस केली असता. तो खूप आधीच निघून गेल्याचे त्यांनी सांगितले. झडती घेतली असता भाविकची स्कूटर रस्त्यावर पडलेल्या अवस्थेत आढळून आली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की एसयूव्हीमध्ये प्रवास करणाऱ्या तीन जणांनी त्याच्या वाहनाला धडक दिली. ज्यामुळे तो खाली पडला आणि नंतर त्याचे अपहरण केले. ()

पायलच्या कुटुंबीयांनी पोलिसांना याची माहिती दिली, लग्नाला कमी कालावधी झाला असल्याने त्यांचा संशय वाढला. चौकशी केली असता पायलने कल्पेश आणि दोन साथीदारांसह पतीच्या हत्येचा कट रचल्याची कबुली दिली. तिच्या कबुली जबाबनुसार, तिने भाविकचे लोकेशन कल्पेशसोबत शेअर केले. त्यानंतर त्याने त्याला अडवले.

कल्पेशने भाविकचे अपहरण करून एसयूव्हीमध्ये गळा आवळून खून केला आणि मृतदेह नर्मदा कालव्यात टाकला. पोलिसांनी पायल, कल्पेश आणि त्याच्या साथीदारांना अटक केली. पोलिसांनी आरोपींवर भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत खून, कट आणि अपहरणाची कलमे लावली आहेत. मृतदेह ताब्यात घेऊन पुढील पुरावे गोळा करण्यासाठी तपास सुरू आहे.