Fuel Rate Today: सर्वसामन्यांच्या खिशावर मोठा ताण! मुंबईमध्ये पेट्रोल 97 तर, डिझेल 88 रुपये प्रतिलिटर

पेट्रोल-डिझेलच्या (Petrol And Diesel Prices) दरात सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. कोरोना माहामारीमुळे आधीच आर्थिक तंगीत आलेल्या सर्वसामन्यांच्या खिशावर मोठा ताण पडत आहे. दरम्यान, पेट्रोल-डिझेलचे दर शंभरीकडे झुकले आहेत.

पेट्रोल डिझेल दरवाढ (Photo Credits: Getty)

पेट्रोल-डिझेलच्या (Petrol And Diesel Prices) दरात सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. कोरोना माहामारीमुळे आधीच आर्थिक तंगीत आलेल्या सर्वसामन्यांच्या खिशावर मोठा ताण पडत आहे. दरम्यान, पेट्रोल-डिझेलचे दर शंभरीकडे झुकले आहेत. देशात आज सलग बाराव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईत आज पेट्रोलच्या किंमतीत 39 पैशांनी तर, डिझेलच्या किंमतीत 37 पैशांनी वाढ झाली आहे. ज्यामुळे मुंबईत प्रतिलीटर पेट्रोल खरेदी करण्यासाठी 97 रुपये तर, डिझेलसाठी 88 रुपये मोजावी लागत आहे. लवकरच हा आकडा शंभर ओलांडण्याची शक्यता आहे.

सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किंमती पुन्हा एकदा वाढवल्या आहेत. या वाढत्या किंमतींमुळे ग्राहकांच्या समस्या आणखी वाढवणार आहेत. मुख्यत: डिझेलच्या वाढणाऱ्या किंमतीचा परिणाम सामान्यांवर होणार आहे. तेल कंपन्या या दररोज सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर करते. यानुसार, आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. हे देखील वाचा- PF Account मध्ये तुम्ही ऑनलाइन अपडेट करू शकता नवीन बँक खात्याची माहिती; जाणून घ्या 'या' महत्त्वाच्या स्टेप्स

पेट्रोल-डिझेलचे आजचे दर-

शहर पेट्रोल डीजल
दिल्ली 90.58 रुपये 80.97 रुपये
मुंबई 97.00 रुपये 88.00  रुपये
कोलकाता 91.78 रुपये 84.56 रुपये
चेन्नई 92.59 रुपये 85.98 रुपये

यावर्षी आतापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर चार रुपयांची वाढ झाली आहे. दरम्यान, जागतिक तेलाच्या बेंचमार्क ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 60 च्या पुढे गेली आहे, जी मागील वर्षातील सर्वाधिक आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement