Year Ender 2022: राजकारणापासून ते मनोरंजनापर्यंत, 2022 या वर्षात घडलेल्या देशातील काही महत्वाच्या मोठ्या घटना, जाणून घ्या सविस्तर

2022 या वर्षातील काही मोठ्या घटना आपण पाहणार आहोत. 2022 मध्ये काँग्रेसला २५ वर्षांनंतर गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष मिळाला, तर यूपी-उत्तराखंड आणि गोव्यात भाजपचे पुनरागमन झाले. दिल्लीनंतर आता पंजाबमध्येही केजरीवाल यांचे सरकार आहे. पाहा

Pixabay

Year Ender 2022: 2022 हे वर्ष आता लवकरच निरोप घेणार आहे. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सगळे जण आतुरतेने वाट पाहात आहे. नवीन वर्ष नवीन आशांनी फुलणार असले तरीही सरत्या वर्षाने अनेक गोष्टी शिकवल्या आहेत. 2022 हे वर्ष संमिश्र स्वरूपाचे राहिले असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. एका महिन्यानंतर आपण 2023 चे स्वागत करू, परंतु जाणाऱ्या वर्षाने आपल्याला काय दिले त्याबद्दलही भाष्य करणे तेवढेच महत्वाचे आहे. 2022 या वर्षातील काही मोठ्या घटना आपण पाहणार आहोत. 2022 मध्ये काँग्रेसला २५ वर्षांनंतर गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष मिळाला, तर यूपी-उत्तराखंड आणि गोव्यात भाजपचे पुनरागमन झाले. दिल्लीनंतर आता पंजाबमध्येही केजरीवाल यांचे सरकार आहे. पाहा [ हे देखील वाचा : Year Ender 2022: जानेवारी ते डिसेंबर, विद्यमान वर्षातील नाट्यमय राजकीय घडामोडी, घ्या जाणून ]

जाणून घ्या सविस्तर

वैष्णव माता मंदिर घटना:  जानेवारीमध्ये वैष्णव माता मंदिरात चेंगराचेंगरी झाली होती, त्यात १२ जणांचा मृत्यू झाला होता.

पीएम मोदींच्या सुरक्षेत निष्काळजीपणा  -  5 जानेवारी रोजी  पंजाब दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदींच्या ताफ्याला अर्धा तास शेतकऱ्यांनी पुलावर अडवले. पंतप्रधान मोदींचा ताफा जिथे थांबला तिथून पाकिस्तानची सीमा फक्त 20 किमी अंतरावर आहे.

लता मंगेशकर यांचे निधन- स्वर कोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या भारतरत्न लता मंगेशकर यांचे  ६ फेब्रुवारी रोजी निधन झाले. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

हिजाब विवाद- कर्नाटकात हिजाबचा वाद ऑक्टोबर 2021 मध्ये सुरू झाला होता, परंतु यावर्षी जानेवारीमध्ये या प्रकरणाने चांगलाच जोर धरला होता. 5 राज्यांतील निवडणुका पाहता या प्रकरणावरून बरेच राजकारण झाले. सर्वोच्च न्यायालयातील दोन न्यायमूर्तींच्या खंडपीठाचा निर्णयही विभागला गेला होता, त्यामुळे हे प्रकरण आता मोठ्या खंडपीठाकडे आहे.

5 राज्यांचे निवडणूक निकाल- 2022 मध्ये  यूपी, उत्तराखंड आणि पंजाबसह पाच राज्यांचे  निवडणूक निकाल समोर आले. गोवा, मणिपूर, यूपी आणि उत्तराखंडमध्ये भाजपने सत्ता स्थापन केली. सीएम योगींनी यूपीत सत्ता स्थापन केली. पंजाबमध्ये आम आदमीची सत्ता आली. आता दिल्लीबाहेरही आम आदमी पक्षाचे पूर्ण बहुमताचे सरकार आहे. 

नुपूर शर्मा वाद- नूपूर शर्मा यांनी मोहम्मद साहेबांबद्दल केलेल्या वादग्रस्त टिप्पणीने देशातच नाही तर संपूर्ण जगात खळबळ उडाली होती. नुपूर शर्मासोबत असलेल्या अनेकांचा खून करण्यात आला होता तसेच अनेकांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. दरम्यान, नुपूर शर्मा यांचे वादग्रस्त विधान टाळत भाजपने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली.

पीएफआयवर बंदी: नुपूर शर्माच्या वक्तव्यावर देशभरातील मुस्लिम संघटनांनी 'सर तन से जुडा'चा नारा देत निदर्शने केली. यानंतर काही दिवसांनी उदयपूरमध्ये हिंदू शिंपी कन्हैयालालची दोन मुस्लिम तरुणांनी निर्घृणपणे गळा आवळून हत्या केली होती. आरोपींनी या हत्याकांडाचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. महाराष्ट्रातील अमरावती येथूनही अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनांमुळे देशात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामागे पीएफआयला जबाबदार धरण्यात आले. त्यानंतर केंद्र सरकारने धार्मिक उन्माद पसरवल्याच्या आरोपावरून या मुस्लिम संघटनेवर बंदी घातली.

महाराष्ट्र-बिहारमध्ये सत्ताबदल - 2022 मध्ये महाराष्ट्र आणि बिहारमध्येही सत्तापरिवर्तन पाहायला मिळाले. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 40 हून अधिक आमदारांनी उद्धव यांच्या विरोधात बंड केले आणि भाजप सोबत मिळून सत्ता स्थापन केली.  तर बिहारमध्ये नितीशकुमार यांनी आरजेडीसोबत महाआघाडीचे सरकार स्थापन करून भाजप पक्षाला बाजूचा रस्ता दाखवला.

द काश्मीर फाइल्सवरून वाद - काश्मिरी पंडितांवरील अत्याचाराचे वर्णन करणारा 'द काश्मीर फाइल्स' हा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटाला जबरदस्त यश मिळाले. या चित्रपटावर बरेच वाद झाले असले तरी. विरोधकांसह एका मोठ्या वर्गाने या चित्रपटाला अपप्रचार म्हणत चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते. दरम्यान, आता पुन्हा एकदा या चित्रपटावरुन वाद सुरु झाला आहे.

काँग्रेसचा बिगर गांधी अध्यक्ष- काँग्रेसला तब्बल २४ वर्षांनंतर गांधी कुटुंबाबाहेरचा अध्यक्ष मिळाला आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे 7,897 मतांनी जिंकले. 

श्रद्धा हत्याकांड- दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडाने सर्वांचे हृदय हेलावले. प्रियकर आफताबने श्रद्धाचा गळा दाबून खून केला आणि त्यानंतर मृतदेहाचे 35 तुकडे करून जंगलात फेकून दिले.आफताब सध्या तिहार तुरुंगात बंद आहे. त्याचवेळी दिल्ली पोलीस अजूनही पुरावे शोधत आहेत. पोलिसांना अद्याप श्रद्धाचे शीर सापडलेले नाही.

दरम्यान, 2022 हे वर्ष संपायला अजून 1 महिना बाकी आहे. आणि सध्या गुजरात निवडणुकीचा निकाल येणे बाकी आहे. त्यामुळे पुढील 1 महिन्यात आणखी काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now