Jammu and Kashmir: कुलगाममध्ये चकमकीत चार दहशतवादी ठार, दोन जवान शहीद
धक्कादायक म्हणजे, या कारवाईत दोन जवान शहीद झाले.
Jammu and Kashmir: जम्मू - काश्मीरच्या कुलगाममध्यु सुरक्षादलांनी चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. धक्कादायक म्हणजे, या कारवाईत दोन जवान शहीद झाले. जम्मू- काश्मीरच्या कुलगाममध्यये शनिवारपासून दहशतवादी हल्ला सुरु होता.या भागात अजूनही अनेक दहशतवादी लपून बसल्याची माहिती आहे. (हेही वाचा- उत्तराखंडमधील चमोली येथे मोटारसायकलवरून जात असताना दगड कोसळून 2 जणांचा मृत्यू; पहा व्हिडिओ
मिळालेल्या माहितीनुसार, कुलगाम जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी दहशतवादी असल्याचा विशिष्ट माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी दहशतवादविरोधी कारवाई सुरु केली होती.संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले की, फ्रिसल भागातील चनीगमा गावात घेराव आणि शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांशी संपर्क प्रस्थापित झाला. या चकमकीत चार दहशतवाद्यांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांना दिली आहे.
चकमकीच्या ठिकाणाला भेट देणारे काश्मीरचे पोलिस महानिरिक्षक व्ही के बिर्डी यांनी सांगितले की, कारवाई सुरुच राहिल. त्यांनी पत्रकारांना सांगितले की, काही दहशतवाद्यांचे मृतदेह दिसले आहेत, परंतु अद्याप चकमक संपलेली नाही. आयजीपी म्हणाले की, चकमकीचे ठिकाण जिल्ह्याच्या अंतर्गत भागात होते. जम्मू-काश्मीर पोलिस आणि सुरक्षा दले दहशतवाद्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. या दहशतवाद्यांना ठार मारणे हे सुरक्षा दलांसाठी महत्त्वाचे यश आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले होते की, दहशतवाद्यांच्या उपस्थितीची विशिष्ट माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी मोदरगाम गावात घेराबंदी आणि शोध मोहीम सुरु केली. त्यांनतर चकमक सुरु झाली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन्ही कारवाया चालू आहेत आणि सुरक्षा दलांनी संबंधित भागाला कडकडीत घेरले आहे.