CAA Protest: सुधारित नागरिकत्व या काळ्या कायद्याला विरोध असणाऱ्यांनी आपल्या घराबाहेर तिरंगा फडकावा - असदुद्दीन ओवैसी

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातील लढाई फक्त मुस्लिमांपुरती मर्यादित नसून यामध्ये दलित आणि अनुसुचित जाती-जमाती यांचाही समावेश आहे. या काळ्या कायद्याला विरोध असणाऱ्यांनी आपल्या घराबाहेर तिरंगा फडकवावा. त्यामुळे भाजपाला हा कायदा चुकीचा असल्याचे समजण्यास मदत होईल, असं विधान ओवैसी यांनी हैदराबादमध्ये केलं.

AIMIM leader Asaduddin Owaisis (PC-ANI)

CAA Protest: सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. देशभरात या कायद्याविरोधात झालेल्या हिंसाचारात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेकांनी सुधारित नागरिकत्व कायद्याला समर्थन दर्शवले आहे. तर काहींनी या कायद्याला विरोध केला आहे. तसेच हा कायदा संमत करणाऱ्या भाजप सरकारवर विरोध पक्षांनी टीकेची झोड उठवली आहे. अशातच एमआमएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी (AIMIM leader Asaduddin Owaisis) यांनी नागरिकत्व कायद्यावरून भाजपवर घणाघाती टीका केली आहे.

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातील लढाई फक्त मुस्लिमांपुरती मर्यादित नसून यामध्ये दलित आणि अनुसुचित जाती-जमाती यांचाही समावेश आहे. या काळ्या कायद्याला विरोध असणाऱ्यांनी आपल्या घराबाहेर तिरंगा फडकवावा. त्यामुळे भाजपाला हा कायदा चुकीचा असल्याचे समजण्यास मदत होईल, असं विधान ओवैसी यांनी हैदराबादमध्ये केलं. जनतेने या कायद्याला शांतता आणि अहिंसेच्या मार्गाने विरोध करावा, असं आवाहन करत ओवैसी यांनी सामूहिकरित्या संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन केले. (हेही वाचा - CAA Protest: नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणाऱ्या आंदोलनात हिंसाचार केल्याप्रकरणी यूपी मधील मृतांचा आकडा 15 वर पोहचला)

दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूरमध्ये नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या भव्य मोर्चाला संबोधित केले. यावेळी त्यांनी नागरिकत्व कायदा हा भारतीय मुस्लिमांच्या विरोधात नसून काँग्रेस पक्षाकडून या काद्यासंदर्भात गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. 'हिंदू' ही जीवन जगण्याची पद्धती आहे. त्यामुळे यात मुस्लिम आणि हिंदू असा भेदभाव नाही, असं म्हटलं आहे.