Happy Women's Day 2021: जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत Surekha Yadav ते Mumtaz Kazi यांनी सांभाळलं मध्य रेल्वेच्या ट्रेनचं सारथ्य; पहा Central Railway चं वूमन्स डे सेलिब्रेशन!

मुंबई मध्ये आज सकाळी सीएसएमटी - पनवेल ट्रेनचं सारथ्य मनिषा म्हस्के यांनी सांभाळलं तर सीएसएमटी-कल्याण ट्रेनचं सारथ्य पहिल्यांदाच महिलेच्या हाती देण्यात आलं होतं.

motorwoman piloting Central Railway | Photo Credits: Twitter/Central railway

आता 21 व्या शतकात चूल आणि मूल इतकंच महिलाचं विश्व मार्यादित राहिलेले नाही. घराबाहेर पडलेल्या महिला संसाराची जबाबदारी सांभाळत आता पुरूषांच्या बरोबरीने काम करत आहेत. आज मध्य रेल्वेने देखील जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत महिला मोटारमॅनच्या हाती सारथ्य दिलं होतं. मुंबई मध्ये आज सकाळी सीएसएमटी - पनवेल ट्रेनचं सारथ्य मनिषा म्हस्के यांनी सांभाळलं तर सीएसएमटी-कल्याण ट्रेनचं सारथ्य पहिल्यांदाच महिलेच्या हाती देण्यात आलं होतं. आज मुमताझ काझी यांनी या मार्गावर ट्रेन चालवली आहे. तर सीएसएमटी कल्याण रेल्वे मध्ये देखील गार्डची जबाबदारी एका महिलेने सांभाळली. या ट्रेन सुटण्यापूर्वी मध्य रेल्वेचे इतर कर्मचारी, अधिकारी प्लॅटफॉर्मवर उपस्थित होते.

मध्य रेल्वेचे वूमन्स डे 2021 सेलिब्रेशन

सकाळी 9 वाजून 6 मिनिटांची सीएसएमटी-पनवेल चालवताना मनिषा म्हस्के

8 वाजून 49 मिनिटांनी सीएसएमटी- कल्याण ट्रेनची गार्ड श्वेता घोणे

झांसी- ग्ल्वालियर दरम्यानच्या बुंदेलखंड स्पेशल ट्रेनची जबाबदारी सार्‍या महिलांनी घेतली

भारतीय रेल्वेच्या पहिल्या महिला मोटारमॅन सुरेख यादव

भारतीय रेल्वेच्या पहिल्या महिला मोटारमॅन सुरेख यादव यांनी आज मुंबई- लखनौ स्पेशल ट्रेन चालवली आहे.

सीएसएमटी - कल्याण मार्गावर पहिली महिला चालक

आज सीएसएमटी - कल्याण मार्गावर पहिली महिला चालक मुमताझ काझी यांनी आज सारस्थ्य सांभाळलं आहे.

दरम्यान आज जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारी शक्तीला सलाम केले आहे. महाराष्ट्रात आज सरकारने महिला दिनाचं औचित्य साधत प्रत्येक राज्यात एक कोविड 19 लसीकरण केंद्र सुरू केले आहे.