West Bengal Explosion: फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटाने दत्तपुकुर हादरले, आठ जणांचा मृत्यू; अनेक घरांचे नुकसान

प्राप्त माहितीनुसार, मजपूर जगन्नाथपूरजवळील एका कारखान्यात झालेला स्फोट इतका जोरदार होता की अनेक घरांचे पत्रे उडाले आणि किमान 10 लोक जखमी झाले.

Explosion प्रतिकात्मक प्रतिमा (PC - ANI)

West Bengal Explosion: पश्चिम बंगालमधील (West Bengal) उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील दत्तपुकुर भागात रविवारी सकाळी बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला. मात्र मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. स्फोट इतका जोरदार होता की, परिसरातील अनेक घरांचेही नुकसान झाले. याआधीही राज्यात इग्रा, बजबूज येथील फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. जखमींना बारासात रुग्णालयात दाखल करण्यात आले

प्राप्त माहितीनुसार, मजपूर जगन्नाथपूरजवळील एका कारखान्यात झालेला स्फोट इतका जोरदार होता की अनेक घरांचे पत्रे उडाले आणि किमान 10 लोक जखमी झाले. यावेळी मृतदेह जागीच विखुरले गेले. या स्फोटातील जखमींना बारासात रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. ही घटना सकाळी आठच्या सुमारास घडली. (हेही वाचा - Karnatak Chain Snatching Video: रस्ता विचारण्याच्या बहाणे वृध्द महिलेच्या गळ्यातली लंपास केली चैन; घटना कॅमेरात कैद)

दरम्यान, गजबजलेल्या भागात फटाका कारखाना कसा चालवण्यात येत होता? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याआधी पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील एग्रा येथे एका बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाला होता आणि या घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला होता. तसेच अनेक जण जखमी झाले होते.