Mohania Fire: मोहनिया पोलिस स्टेशन परिसरात आग, घटनेत दुचाकी जळून खाक (Watch Video)

बिहारमधील कैमुर जिल्ह्यात मोहनिया पोलिस स्टेशन परिसरात आग लागल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी उशिरा रात्री आग लागली. आगीची माहिती तात्काळ अग्निशमन दलाला देण्यात आली.

Mohania Fire: PC TW

Mohania Fire:  बिहारमधील (Bihar) कैमुर जिल्ह्यात मोहनिया पोलिस स्टेशन परिसरात आग लागल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी उशिरा रात्री आग लागली. आगीची माहिती तात्काळ अग्निशमन दलाला देण्यात आली. काही वेळाने आग आटोक्यात आली अशी माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी कुंदन कुमार यांनी दिली. आग नेमकी कशी लागली याचा शोध घेण्यात येत आहे. सुदैवाने कोणतीही दुखापत झाली नाही. (हेही वाचा- मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाशेजारील घराला भीषण आग)

मिळालेल्या माहितीनुसार, मोहनिया पोलिस स्टेशनच्या कॅम्पसमध्ये आग लागली. वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये जप्त केलेल्या अनेक बाईक आणि स्कूटी या आगीत जळून खाक झाल्या. आगीमुळे परिसरात धुरांचे लोट पसरले आहे. अग्निशनच्या दोन ते तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही आग सर्किटमुळे लागली आणि ती वेगाने पसरली.

शॉर्ट सर्किटमुळे लागलेली आग वेगात पसरली. आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आगीनंतर घटनास्थळी कुलींचे काम सुरु होते. अग्निशमन दलाच्या अथाक प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आली. आगीत बराच बाईक जळून खाक झाल्या होत्या.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now