Fire Erupts at Income Tax office in Delhi: दिल्लीतील आयकर कार्यालयाला आग; अग्निशमन दलाच्या 21 गाड्या घटनास्थळी दाखल (Watch Video)

आगीचे नेमके कारण आणि आग किती प्रमाणात लागली याबाबतचा अधिक तपशील अद्याप समोर आलेला नाही.

Fire Erupts at Income Tax office in Delhi (PC - X/ANI)

Fire Erupts at Income Tax office in Delhi: दिल्ली आयकर कार्यालयाच्या (Income Tax office in Delhi) इमारतीला आज दुपारी आग (Fire) लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवलं. खबरदारीचा उपाय म्हणून इमारत तातडीने रिकामी करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार, इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर ही आग लागली. आगीचे नेमके कारण आणि आग किती प्रमाणात लागली याबाबतचा अधिक तपशील अद्याप समोर आलेला नाही. आतापर्यंत या घटनेमुळे कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. अधिकारी परिस्थितीचे मूल्यांकन करत आहेत.

दक्षिण दिल्लीत स्फोटामुळे निवासी इमारतीला आग -

दरम्यान, आज आणखी एका वेगळ्या घटनेत, दक्षिण दिल्लीतील एका निवासी इमारतीत दोन गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यानंतर आग लागली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. (हेही वाचा -Delhi Excise Policy Case: दिल्ली अबकारी धोरण प्रकरणी के कविता यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ)

पहा व्हिडिओ - 

अग्निशमन सेवांकडून त्वरित प्रतिसाद -

दिल्ली अग्निशमन सेवांनी शहापूर जाट परिसरात असलेल्या निवासी इमारतीत आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या.

बवाना परिसरात केमिकल फॅक्टरीत स्फोट -

दोनच दिवसांपूर्वी, रविवारी, 12 मे रोजी, दिल्लीच्या बवाना भागातील एका रासायनिक कारखान्यात स्फोट झाला होता. त्यानंतर मोठी आग लागली. या घटनेत किमान सात जण जखमी झाले असून त्यापैकी तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे.