Andhra Pradesh Suicide Case: कौटुंबिक वादाला कंटाळून पत्नीची पतीसमोरच गळफास घेऊन आत्महत्या, पतीने व्हिडिओ शूट करून पाठवला पत्नीच्या आई वडिलांना

जी त्याने नंतर कुटुंबातील इतर सदस्यांना पाठवली होती.

Suicide | Representational Image (Photo Credits: Pixabay)

आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) नेल्लोरमध्ये (Nellore) पोलिसांनी (Police) एका व्यक्तीला आपल्या पत्नीला (Wife) शिवीगाळ केल्याबद्दल आणि तिच्या आत्महत्येचा (Suicide) व्हिडिओ रेकॉर्ड केल्याबद्दल अटक केली आहे. जी त्याने नंतर कुटुंबातील इतर सदस्यांना पाठवली होती. ही घटना नेल्लोर जिल्ह्यातील आत्मकूर शहरात घडली आहे. 29 वर्षीय कोंडम्मा असे मृत व्यक्तीचे असून तिचे लग्न 12 वर्षांपासून पेंकलैयाशी झाले होते. या जोडप्याला दोन मुले आहे. पत्नीला विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय घेत पेंचालय काही काळापासून कोंडम्माला त्रास देत होता.  मंगळवारी रात्री दोघांमध्ये जोरदार वाद झाला आणि कोंडम्मा यांनी तिचे आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. तिने छताच्या पंख्याला साडी बांधून पती आणि मुलांसमोर गळफास लावला.

पत्नीला थांबवण्याऐवजी पेंचालयाने कोंडम्माचे शेवटचे क्षण चित्रित केले. तसेच तो व्हिडिओ त्याच्या पत्नीच्या नातेवाईकांना पाठवला. त्यांना अंतिम संस्कार करण्यासाठी तिचा मृतदेह खाली काढण्यास सांगितले. कोंडम्माच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे आत्मकुर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच पेंचालयला अटक केली आहे. कोंडम्मा MEPMA साठी रिसोर्स पर्सन म्हणून काम करत  असून पेंकलैया आत्मकुरमध्ये एटीएम सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. हेही वाचा  Madhya Pradesh: माणुसकीला काळीमा! घरातून पळून गेल्याच्या रागातून तरुण-तरुणीच्या गळ्यात टायर घालून समाजासमोर नाचवले; Video व्हायरल, तिघांना अटक

कोंडम्माने तिचे आयुष्य संपवल्यानंतर त्याने तो व्हिडिओ तिच्या आई -वडिलांनाही पाठवला, जे त्यांच्या मुलीला फाशी घेतल्याचे पाहून धक्का बसले आणि त्यांनी लगेच पोलिसांना कळवले. आत्मकूर उपनिरीक्षक शिवशंकर यांनी माध्यमांना सांगितले, महिलेने क्षणभर आशा केली की तिचा नवरा तिला आयुष्य संपवण्यापासून थांबवेल. जसे की व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते. परंतु त्याऐवजी त्याने तिला भडकवणे सुरू ठेवले आणि ती गुदमरून गेली म्हणून व्हिडिओ रेकॉर्ड करत राहिली. त्यानंतरही, तिला वाचवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्याने तो व्हिडिओ तिच्या पालकांना पाठवला. पती तिला त्रास देत असे, त्यानंतर तिने टोकाचे पाऊल उचलले. आम्ही तिच्या नातेवाईकांच्या अहवालाच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे. आम्ही यात सहभागी असलेल्यांवर कायदेशीर कारवाई करू.