Emergency Alert Test Message: मोबाईलवर एकाच वेळी इमरजेंसी अलर्ट मैसेज; सर्वांचा उडाला गोंधळ, नेमकं काय आहे हे प्रकरण जाणून घ्या

या मॅसेज मध्ये “हा भारत सरकारच्या दूरसंचार विभागाकडून एक चाचणी इशारा आहे. त्यामुळे घाबरण्याचे कोणतेही कारण नाही.

Alert message Photo credit insta
Emergency Alert Test Message:  देशातील  नागरिकांच्या मोबाईलवर 10.20 च्या सुमारास एक इमर्जन्सी अलर्ट आला. अचानक स्क्रिनवर हा मेसेज दिसला असेल तर घाबरू नका. सध्या या मेसेजचा कोणताही धोका नसून ही केवळ एक सरकार (Government) कडून  एक चाचणी करण्यात आली होती. देशभरातील लोकांच्या स्मार्टफोनवर (Smartphone)  सकाळी 10.20 वाजेच्या सुमारास एक इमर्जन्सी अलर्ट आला. तुमच्याही मोबाईलवर असा अलर्ट आला असेल, तर काळजी करण्याची गरज नाही. सध्या कोणताही धोका आलेला नसून, ही केवळ एक चाचणी होती.
Emergency alert severe अशा स्वरूपाचा मॅसेज मोबाईलवर आला. या मॅसेज मध्ये “हा भारत सरकारच्या दूरसंचार विभागाकडून एक चाचणी इशारा आहे. 20-07-2023 10:31 AM” असा तो मॅसेज होता. हा मेसेज एकाचवेळी अनेकांच्या मोबाईलवर दिसल्यामुळे सर्वत्र खळबळ नक्कीच उडाली आहे. या मेसेंज मधून गोंधळून जावू नका.

देशातील  केंद्र सरकारच्या टेलिकम्युनिकेशन विभागाने हा अलर्ट जारी केला होता. या माध्यमातून आपत्कालीन परिस्थितीमध्ये आणि देशात जर आणीबाणी लागली असेल तेव्हा  सर्व नागरिकांना एकाच वेळी सूचना देण्याच्या यंत्रणेची चाचणी घेण्यात आली. यामुळे भविष्यात अशी परिस्थिती निर्माण झाल्यास सर्व नागरिकांना वेळेत अलर्ट मिळणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत एकाच वेळी अलर्ट जारी करण्यासाठी ही चाचणी घेण्यात आली आहे.