UPSC Preliminary Exam 2020 चा निकाल जाहीर; Main Exam साठी 28 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर पर्यंत अर्ज भरण्याची मूदत

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) नागरी सेवा प्राथमिक परीक्षेचा निकाल शुक्रवारी (23 ऑक्टोबर) जाहीर केला. 4 ऑक्टोबरला झालेल्या परीक्षेचा निकाल विद्यार्थी यूपीएससीच्या www.upsc.gov.in या संकेतस्थळावर वर पाहु शकतात.

Union Public Service Commission (Photo Credits: PTI)

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (Union Public Service Commission) नागरी सेवा प्राथमिक परीक्षेचा (Civil Services Preliminary Examination) निकाल शुक्रवारी (23 ऑक्टोबर) जाहीर केला. 4 ऑक्टोबरला झालेल्या परीक्षेचा निकाल विद्यार्थी यूपीएससीच्या www.upsc.gov.in या संकेतस्थळावर वर पाहु शकतात. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नागरी सेवा मुख्य परीक्षा 2020 (Civil Services Main Examination) साठी Detailed Application फॉर्म -1 (डीएएफ -1) मध्ये पुन्हा अर्ज करण्यास UPSC कडून सांगण्यात आले आहे.

हा फॉर्म https://upsconline.nic.in वर 28 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर या कालावधीत संध्याकाळी 6 पर्यंत उपलब्ध आहे. डीएएफ -1 भरण्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना वेबसाईटवर उपलब्ध आहेत. नागरी सेवा (मुख्य) परीक्षा 2020 ही 8 जानेवारी 2021 रोजी घेण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांसाठी ई-अॅडमिट कार्ड आणि वेळापत्रक परीक्षा सुरू होण्याच्या तीन-चार आठवड्यांपूर्वी आयोगाच्या वेबसाइटवर अपलोड केले जाईल, असेही युपीएससीकडून सांगण्यात आले आहे. डीएएफ -1 च्या सबमिशननंतर पत्ता, ईमेल, मोबाईल क्रमांक यामधील बदल एकाचवेळी आयोगाला कळवता येतील.

सिव्हिल सर्व्हिसेसच्या प्राथमिक परीक्षा 2020 च्या स्क्रीनिंग टेस्टच्या गुण, कट-ऑफ मार्क्स आणि answer keys अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतरच आयोगाच्या https://upsc.gov.in संकेतस्थळावर अपलोड केले जातील.

उमेदवारांना निकालासंबंधित किंवा इतर माहिती कामकाजाच्या दिवशी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत मिळू शकेल. यासाठी युपीएससीकडून 11-23385271, 011-23098543 आणि 011-23381125हे संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत. (UPSC Pre-Competitive Training Scheme: युपीएससी स्पर्धापूर्व प्रशिक्षण योजनेंतर्गत, प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात प्रती महिना 2 हजार रुपयांवरुन 4 हजार रुपये वाढ)

दरवर्षी यूपीएससीतर्फे सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा प्राथमिक, मुख्य आणि मुलाखत अशा तीन टप्प्यात आयोजित केली जाते. भारतीय प्रशासकीय सेवेचे (आयएएस), भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस) आणि भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) यासह इतर अधिकारी निवडण्यासाठी या परीक्षा घेतल्या जातात. दरम्यान, यंदा कोरोना व्हायरस संकटामुळे प्रचंड गोंधळ, संभ्रमानंतर परीक्षा पार पडल्या. तसंच विद्यार्थ्यांसाठी विशेष नियम लागू करण्यात आले होते.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now