Fake University: देशात तब्बल 21 बनावट विद्यापीठ, UGC ने जाहीर केली यादी; जाणून घ्या महाराष्ट्रातील कुठल्या विद्यापीठाचा समावेश
विद्यार्थ्यांसह सर्वसामन्यांना माहिती देण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून बनावट विद्यापीठांची यादी जाहिर करण्यात आली आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (UGC) देशातील बनावट विद्यापीठांची यादी घोषित करण्यात आली आहे. बोगस विद्यापीठांच्या (Fake University) यादीत महाराष्ट्राच्या विद्यापीठाचाही समावेश आहे. तरी देशातील सर्वाधिक बनावट विद्यापीठ देशाची राजधानी दिल्ली (Delhi) आणि त्यापाठोपाठ उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) आहेत. ही बनावट विद्यापीठ विद्यार्थ्यांना पदवी (Degree Certificate) देऊ शकत नाहीत. म्हणजेच या विद्यापीठातून शिक्षण पुर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिकृत पदवी मिळू शकत नाही. म्हणजेचं शिक्षण घेवूनही न घेतल्या बरोबरचं. या सगळ्या बोगस प्रकारातून विद्यार्थ्यांसह (Students) सर्वसामन्यांना माहिती देण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (Universities Grant Commission) बनावट विद्यापीठांची यादी जाहिर करण्यात आली आहे. तरी तुम्ही कुठल्याही विद्यापीठात प्रवेश घेण्याचा विचार करत असल्यास ही यादी जरुर पडताळून पहा.
विद्यापीठ अनुदान आयोगाकडून जाहिर केलेल्या या यादीत दिल्लीत 8, उत्तर प्रदेशात 4, पश्चिम बंगाल (West Bengal) आणि ओडिशामध्ये (Odisha) प्रत्येकी 2 आणि कर्नाटक (Karnataka), केरळ (Kerala), महाराष्ट्र (Maharashtra), पुद्दुचेरी (Pondicherry) आणि आंध्र प्रदेशमध्ये (Andhra Pradesh) प्रत्येकी एक बोगस विद्यापीठाचा समावेश आहे. बनावट विद्यापीठांबाबत UGCने जारी केलेल्या सार्वजनिक नोटीसमध्ये विद्यार्थी (Students) आणि सामान्य जनतेला कळवण्यात आले आहे की, देशाच्या विविध भागांमध्ये 21 स्वयं-डिझाइन केलेल्या, मान्यता नसलेल्या संस्था कार्यरत आहेत, ज्या विद्यापीठ अनुदान आयोग कायदा 1956 चे उल्लंघन करत आहेत. (हे ही वाचा:- NEET 2022 Result Date: NTA कडून नीट 2022 निकालाची तारीख जाहीर; पहा neet.nta.nic.in वर कधी, कसे पाहू शकाल मार्क्स)
या यादीत महाराष्ट्रातील (Maharashtra) एका विद्यापीठाचा समावेश असला तरी शैक्षणिक दृष्ट्या ही बाब चिंताजनक आहे. कारण राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमधील (Nagpur) राजा अरेबिक विद्यापीठाचा बनावट विद्यापीठाच्या यादीत समावेश आहे. तरी नागपूरसह राज्यातील इतरही विद्यार्थ्यांनी या विद्यापीठात प्रवेश घेतला असल्यास किंवा घेण्याच्या तयारीत असाल तर सावधान कारण हे विद्यापीठ तुम्हाला कुठल्याही प्रकारची पदवी देण्यास पात्र नाही.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)