UGC NET Result 2020 Released: NTA ने जाहीर केला युजीसी नेट जून परीक्षेचा निकाल;nta.ac.in वर पहा गुण, कट ऑफ लिस्ट

ऑनलाईन तुम्ही कट ऑफ मार्क्ससोबत रिझल्ट देखील पाहू शकता. आज सकाळी 10 च्या सुमारास एनटीए कडून निकाल जाहीर करण्यात आला आहे.

Representational Image (Photo Credits: Pixabay)

UGC NET Result 2020 कडे डोळे लावून बसलेल्या परीक्षार्थींचा आज (1 डिसेंबर) जाहीर करण्यात आला आहे. NTA ने आज सुमारे 5 लाख विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला आहे. nta.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. यंदा कोविड 19 च्या सावटाखाली सप्टेंबर 24 ते नोव्हेंबर 13 दरम्यान परीक्षा पार पडल्या होत्या. या परीक्षेमध्ये 8,60,976 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले होते मात्र प्रत्यक्षात परीक्षा 5,26,707 जणांनी दिली होती. त्याचे निकाल आता हाती आले आहेत.

कम्युटर बेस्ड परीक्षा फॉर्मेट मध्ये 81 विषयांसाठी 12 दिवस प्रत्येकी 2 शिफ्ट मध्ये परीक्षा पार पडल्या होत्या. दरम्यान 30 नोव्हेंबर दिवशी त्याची आंसर की देखील ऑनलाईन उपलब्ध करण्यात आली होती. त्यानंतर आज परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे.

UGC NET Result 2020 ऑनलाईन कसा बघाल?

एनटीए कडून विषयवार कट ऑफ मार्क्स, कट ऑफ पर्सेंटाईल्स देखील ऑनलाईन जारी केले आहेत. ऑनलाईन तुम्ही कट ऑफ मार्क्ससोबत रिझल्ट देखील पाहू शकता. आज सकाळी 10 च्या सुमारास एनटीए कडून निकाल जाहीर करण्यात आला आहे.