SBI CBO Recruitment 2020: पदवीधर तरूणांसाठी एसबीआय मध्ये 3850 जागांसाठी नोकरभरती; sbi.co.in वर 16 ऑगस्टपूर्वी करा अर्ज

स्टेट बॅंक ऑफ इंडिया (The State Bank of India) म्हणजेच एसबीआयमध्ये आता Circle Based Officer (CBO)या पदासाठी नोकरभरती सुरू झाली आहे.

SBI (Photo Credits: Facebook)

स्टेट बॅंक ऑफ इंडिया (State Bank of India) म्हणजेच एसबीआयमध्ये आता Circle Based Officer (CBO) या पदासाठी नोकरभरती सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार एसबीआयची अधिकृत वेबसाईट sbi.co.in ला भेट देऊन ऑनलाईन अर्ज दाखल करू शकतात. बॅंकेकडून आता 3,850 जागांसाठी ही भरती असेल अशी माहिती देण्यात आली आहे. दरम्यान मुंबई वगळता महाराष्ट्रातील काही भाग, बेंगळूरू, अहमदाबाद, हैदराबाद, चैन्नई, जयपूर, भोपाळ सर्कलमध्ये एसबीआय सीबीओ साठी भरती करणार आहे. त्यासाठी उमेदवारांना 16 ऑगस्ट पूर्वी ऑनलाईन अर्ज दाखल करावा लागणार आहे.

एसबीआयच्या CBO पदाच्या नोकर भरती बद्दल तपशील

कोणकोणत्या सर्कल मध्ये किती जागांवर होणार भरती?

गुजरात -750 जागा

कर्नाटक -750 जागा

मध्य प्रदेश - 296 जागा

छत्तीसगड - 104 जागा

तमिळ नाडू - 55 जागा

तेलंगणा - 550 जागा

राजस्थान - 300- जागा

मुंबई वगळता महाराष्ट्र -517 जागा

गोवा-33 जागा

महत्त्वाच्या तारखा

ऑनलाईन रजिस्ट्रेशन - 27 जुलै पासून

अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख - 16 ऑगस्ट

अ‍ॅप्लिकेशन फी

उमेदवारांसाठी अ‍ॅप्लिकेशन फी ही नॉन रिफंडेबल असेल.जनरल/ ईड्ब्लूएस/ ओबीसी कॅटेगरीच्या उमेदरवारांना 750 रूपये फी आहे. तर SC/ST/PWD वर्गातील उमेदवरांना विनामुल्य अर्ज करता येईल.

एसबीआय बॅंकेमध्ये CBO पदासाठी अर्ज करताना पात्रता निष्कर्ष पाहणं गरजेचे आहे. दरम्यान उमेदवाराला किमान 2 वर्ष रिजनल रूरल बॅंकेमध्ये किंवा शेड्युल कमर्शिअल बॅंकेमध्ये किमान 2 वर्षांचा ऑफिसरपदाचा अनुभव आवश्यक आहे.



संबंधित बातम्या