
National Testing Agency कडून NEET UG Result 2025 आज जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. निकालाची वेळ सांगण्यात आलेली नाही मात्र एनटीए च्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल जाहीर होण्याचा अंदाज आहे. यंदा नीट अर्थात National Eligibility cum Entrance Test दिलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल neet.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार आहे. दरम्यान नीट परीक्षेची final answer key जारी करण्यात आली आहे.
नीट ची परीक्षा 4 मे 2025 दिवशी घेण्यात आली आहे. दुपारी 2 ते 5 या एकाच शिफ्ट मध्ये ही परीक्षा झाली आहे. या परीक्षेसाठी 5453 सेंटर्स होती. देशात 500 शहरांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली आहे. यंदा नीटच्या परीक्षेला सामोरे गेलेल्यांची संख्या सुमारे 22.7 लाख आहे. NEET UG provisional key 3 जून दिवशी जाहीर झाली. NEET 2025 Controversy: नीट परीक्षा अनियमितता, विद्यार्थ्याच्या OMR शीटच्या कथित छेडछाड; सुप्रिया सुळे आक्रमक; चौकशीची मागणी .
NEET UG Result 2025 कसा पहाल?
- neet.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
- NEET UG 2025 result link तुमच्या होम पेज वर दिसेल.
- आता तुमचे लॉगिन डीटेल्स टाका.
- तुमचा निकाल स्क्रिन वर दिसेल.
निकाल पाहण्यासाठी Application number आणि जन्म तारीख टाकावी लागणार आहे.
NEET 2025 चा निकाल फक्त ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला जाईल. NTA यशस्वी उमेदवारांची किंवा टॉपर्सची नावे असलेली गुणवत्ता यादी जारी करेल. दुसरीकडे, वैयक्तिक उमेदवारांसाठी NEET 2025 स्कोअरकार्ड जारी केला जाईल, जो त्यांना NEET 2025 वेबसाइटवरून त्यांच्या नोंदणी प्रमाणपत्रांसह डाउनलोड करावा लागेल.
वैद्यकीय क्षेत्रामध्ये MBBS, BDS, BSc Nursing, BAMS, BUMS, BSMS
BHMS, BVSc & AH या कॉर्सेसचे शिक्षण घेणार्यांना नीट परीक्षा आवश्यक आहे. या कोर्सेसच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये नीट परीक्षेचे गुण पाहिले जातात.
2024 मध्ये, सामान्य श्रेणीतील उमेदवारांसाठी NEET UG कट-ऑफ पर्सेंटाइल 50 होता, तर OBC, SC आणि ST श्रेणीतील उमेदवारांसाठी तो 40 होता. NEET UG2025 साठी पर्सेंटाइल अखिल भारतीय गुणवत्ता यादीत मिळवलेल्या सर्वोच्च गुणांच्या आधारे मोजला जाईल.