NCERT e-Jaadui Pitara Mobile App: आता मुले खेळत खेळत करणार अभ्यास; NCERT ने आणली नवीन कल्पना, लॉन्च केला 'ई-जादूई पिटारा मोबाइल ॲप'

या ॲपमध्ये खेळणी, खेळ, कोडी, कठपुतळी, पोस्टर, फ्लॅशकार्ड, स्टोरी कार्डचा समावेश आहे. लहान मुलांच्या विकासासाठी NCERT ने पालक आणि शिक्षकांसाठी हे ॲप तयार केले आहे.

NCERT e-Jaadui Pitara Mobile App (फोटो सौजन्य -X@ncert)

NCERT e-Jaadui Pitara Mobile App: नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) ने मुलांच्या शिक्षणासंदर्भात एक नवीन कल्पना आणली आहे. NCERT च्या या नव्या कल्पनेमुळे लहान मुलं अगदी खेळत खेळत अभ्यास करणार आहेत. NCERT ने 3 ते 8 वर्षे वयोगटातील मुले, त्यांचे शिक्षक आणि पालक यांच्यासाठी 'ई-जादुई पिटारा' नावाचे ॲप (e-Jaadui Pitara Mobile App) लाँच केले आहे. या ॲपच्या माध्यमातून मुले खेळता खेळता अभ्यास पूर्ण करतील. यामुळे पुस्तकांची गरजही कमी होईल.

या ॲपमध्ये तीन एआय बॉट्स आहेत – कथा सखी, पालक तारा आणि शिक्षक तारा. शिक्षक, पालक आणि विद्यार्थी या चॅटबॉट्सना प्रश्न विचारू शकतात आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे त्वरित मिळवू शकतात. याशिवाय परिषद 'प्रॉम्प्ट ऑफ द डे' नावाची मोहीमही राबवत आहे. या ॲपमध्ये खेळणी, खेळ, कोडी, कठपुतळी, पोस्टर, फ्लॅशकार्ड, स्टोरी कार्डचा समावेश आहे. लहान मुलांच्या विकासासाठी NCERT ने पालक आणि शिक्षकांसाठी हे ॲप तयार केले आहे. (हेही वाचा -NCERT Textbooks: एनसीईआरटी द्वारे पाठ्यपुस्तकांमध्ये बदल; इयत्ता 12 वी इतिहासातून मुघल साम्राज्यावरील धडा हटवला)

चॅटबॉट्स कसे कार्य करते?

  • 'ई-जादुई पिटारा' अॅपसाठी पालकांना पोर्टलवरील भाषा निवडावी लागेल. त्यानंतर, त्यांना त्यांच्या मुलांसाठी तीन एआय चॅटबॉट्सपैकी एक निवडावा लागेल.

    कथा सखी ही तुमची स्वतःची कथा तयार करण्यासाठी आहे.

    तुम्ही, तुमच्या मुलांना घरी बसवून पालक तारा या चॅट्बॉट्सचा वापर करू शकता.

    शिक्षक ताराच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत सहभागी करून घेऊ शकता. तसेच येथे तुम्हाला शाळेतील सूचना पाहता येतील.

'जादुई पितारा' ॲप कसे ॲक्सेस करावे?

'जादुई पितारा' मध्ये प्रवेश करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन ॲप डाउनलोड करावे लागेल. हे बॉट्स व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामच्या माध्यमातूनही वापरता येतात. या बॉट्समध्ये प्रवेश करण्यासाठी NCERT ने व्हॉट्सॲप नंबर आणि टेलिग्राम आयडी शेअर केला आहे. व्हॉट्सॲपद्वारे या ॲपमध्ये प्रवेश करण्यासाठी, एखाद्याला ई-जादुई पिटाराच्या व्हॉट्सॲप नंबर, 9599961445 वर मजकूर पाठवणे आवश्यक आहे किंवा ते t.me/eJaaduiPitara_bot किंवा IVRS- 15108 द्वारे टेलिग्रामवर याचा वापर करू शकतात.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now