NEET UG 2022 Result आज होणार जाहीर; neet.nta.nic.in वर पहा स्कोअर कार्ड

या परीक्षेला 18.72 लाख विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी 95% विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली होती

Results | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

नॅशनल टेस्टिंग एजन्सी कडून यंदा पार पडलेल्या National Eligibility cum Entrance Test Undergraduate अर्थात NEET UG 2022 चा निकाल आज (7 सप्टेंबर) जाहीर केला जाणार आहे. आज अंतिम निकालासोबतच एनटीए अंतिम आन्सर (Answer Key) की आणि मेरीट लिस्ट (Merit List)  देखील जाहीर करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी नीट 2022 ची परीक्षा दिली आहे त्यांना आपला निकाल neet.nta.nic.in या अधिकृत वेबसाईट वर पाहता येणार आहे.

एनटीए कडू जारी नोटिफिकेशन मध्ये निकालाची केवळ तारीख देण्यात आली आहे. निकालाची वेळ दिलेली नाही. पण आज संध्याकाळच्या सत्रात निकाल जाहीर केला जाऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना neet.nta.nic.in या वेबसाईट वर लक्ष ठेवावे लागणार आहे.

नीट युजी 2022 चा निकाल कसा पहाल?

नीट युजी 2022 परीक्षा 17 जुलै दिवशी घेण्यात आली आहे. या परीक्षेला 18.72 लाख विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी 95% विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली होती. 3570 केंद्रांवर परीक्षा झाली आहे त्यासाठी 497 भारतातील शहरं आणि परदेशात 14 शहरांमध्ये परीक्षा केंद्र उपलब्ध करून दिली होती.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif