Maharashtra Board 12th Result 2022 उद्या ऑनलाईन कसा आणि कुठे पहाल?
यावेळी अंदाजे 15 लाख विद्यार्थ्यांचे मार्क्स जाहीर केले जाणार आहेत.
MSBSHSE 12th Result 2022: मार्च-एप्रिल 2022 मध्ये यंदा पार पडलेली 12वी ची परीक्षा कोरोनाच्या सावटाखालीच विद्यार्थ्यांनी दिली आहे. 2 वर्षांनंतर राज्याच्या शिक्षण मंडळाकडून ऑफलाईन स्वरूपात बोर्डाचे सारे पेपर सुरळीत पार पडले आहेत. आता 10वी, 12वीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालाचे वेध लागले आहेत. यंदा 12 वीचा निकाल (Maharashtra Board 12th Result) 8 जून मंगळवारी जाहीर केला जाणार आहे. दरम्यान दुपारी 1 वाजता विद्यार्थी आपला निकाल ऑनलाईन पाहू शकणार आहेत. राज्य शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहण्याची सोय केली आहे.
वर्षा गायकवाड यांचे ट्वीट
12वीचा निकाल ऑनलाईन कोण-कोणत्या संकेतस्थळांवर पाहू शकाल?
यंदा 12वीचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळासोबतच काही थर्ड पार्टी वेबसाईटसच्या माध्यमातूनही पाहता येणार आहे.
12 वीचा ऑनलाईन निकाल कसा पहाल ?
- बारावीचा निकाल ऑनलाईन पाहण्यासाठी वेबसाईटला भेट दिल्यानंतर होमपेज वर 12वी निकालाचा पर्याय निवडा.
- आता तुम्हांला एका नव्या विंडोवर रिडीरेक्ट केलं जाईल, तिथे तुम्हांला रोल नंबर (Roll Number) आणि आईचं नाव (Mother's Name) टाईप करायचं आहे.
- त्यापुढे View Result वर क्लिक करा.
- तुम्ही उत्तीर्ण असाल तर तुम्हांला तुमचा निकाल पाहता येईल.
- तुमच्या निकालाची प्रिंट आऊट काढण्याची, सेव्ह करण्याची सोय आहे.
दरम्यान यंदा पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर,कोकण या 9 विभागात मिळून राज्यात 14,85,191 विद्यार्थ्यांनी नोंदणी झाली होती. यापैकी 817,188 मुलं आणि मुली 6,68,003 आहेत. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.