IIT मुंबईच्या विद्यार्थ्याला मिळाले मायक्रोसॉफ्ट कंपनीकडून करोडोंचे पॅकेज; वाचा सविस्तर
उबर, गूगल, मायक्रोसॉफ्ट सारख्या टॉप कंपन्यांचं यात वर्चस्व दिसून येत आहे.
इंजिनीरिंगच्या विद्यार्थ्यांमध्ये सध्या संघर्ष दिसून येत आहे तो कॅम्पस प्लेसमेंटमध्ये सर्वाधिक पॅकेज असलेली कंपनी आपल्याला ऑफर कशी देईल याचा. या प्लेसमेंटच्या शर्यतीत नेहमीच टॉपवर असते ते म्हणजे आयआयटी मुंबई हे कॉलेज. विशेष म्हणजे या वर्षी, आयआयटी मुंबईच्या कॅम्पस प्लेसमेंटच्या अगदी पहिल्याच दिवशी मोठमोठ्या कंपन्यांनी विद्यार्थ्यांना प्लेसमेंट दिली आहे. उबर, गूगल, मायक्रोसॉफ्ट सारख्या टॉप कंपन्यांचं यात वर्चस्व दिसून येत आहे.
यावर्षी मायक्रोसॉफ्ट कंपनीकडून एका विद्यार्थ्याला 1.17 कोटी रुपयांचे पॅकेज मिळाले आहे तर उबर कंपनीकडून 1.02 कोटी रुपयांचे पॅकेज दिले आहे. तसेच गुगल कंपनीकडून ३२ लाख रुपयांचे पॅकेज विद्यार्थ्याला ऑफर करण्यात आले आहे.
आयआयटी मुंबईच्या प्लेसमेंट सेलकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार पहिल्या दिवशी झालेल्या पहिल्या टप्प्यात 18 कंपन्यांकडून विद्यार्थ्यांची प्लेसमेंट झाली. तसेच पहिल्या दिवसाचा दुसरा टप्पा हा रात्री २ वाजेपर्यंत सुरु होता. परंतु त्यात किती कंपन्यांकडून विद्यार्थ्यांना ऑफर देण्यात आली हे अद्याप कळलेलं नाही.
सध्या अनेक क्षेत्रात आर्थिक मंडी सुरु असल्यामुळे, यंदा प्लेसमेन्टसाठी कमी कंपनी येतील अशी शंका वर्तवण्यात येत होती. परंतु, हा अंदाज फेल ठरवत मायक्रोसॉफ्ट, उबर आणि गूगल यासारख्या कंपन्यांनी कॅम्पस प्लेसमेंटला हजेरी लावल्याने विद्यार्थी देखील आनंदात आहेत. तसेच पहिल्याच दिवशी एकूण 110 विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्या आहेत तर 1700 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.