MHT CET Result 2021: एमएचटी सीईटी चा निकाल आज संध्याकाळी 7 वाजता mhtcet2021.mahacet.org वर कसा पहाल?
MHT CET 2021 परीक्षा यंदा 20 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान पार पडली आहे. MHT CET 2021 ही परीक्षा महाराष्ट्रात इंजिनियरिंग, फार्मसी आणि कृषी क्षेत्रातील अंडरग्रॅज्युएट कोर्सच्या विद्यार्थ्यांसाठी असते. या मार्कांवर त्यांचे कॉलेजचे प्रवेश निश्चित केले जातात.
महाराष्ट्र राज्य सीईटी कक्षाकडून (Maharashtra Common Entrance Test, Maha CET) घेण्यात आलेली MHT CET 2021 ऑनलाईन प्रवेश परीक्षेचा निकाल आज(27 ऑक्टोबर) संध्याकाळी 7 नंतर जारी केला जाणार आहे. इंजिनियरिंग (B. Engineering) , फार्मसी (B. Pharmacy) आणि अन्य अंडर ग्रॅज्युएट प्रोफेशनल कोर्ससाठी घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षेचा आज निकाल आहे. विद्यार्थी हा निकाल mhtcet2021.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर स्वतःच्या लॉगीनमधून पाहू शकणार आहेत.
MHT CET 2021 परीक्षा यंदा 20 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान पार पडली आहे. त्यानंतर उत्तरतालिका प्रसिद्ध करत आक्षेप मागवण्यात आले होते. सीईटी सेलने दिलेल्या माहितीनुसार, 111 आक्षेप आले होते. त्यापैकी 23 स्वीकरण्यात आले आहेत. उदाहरण दिलेले 8 आणि 15 प्रश्न चूकीचे ठरवण्यात आले आहे. या प्रश्नांकरिता विद्यार्थ्यांना पूर्ण मार्क दिले जाणार आहेत.
MHT CET 2021 निकाल ऑनलाईन कसा पहाल?
- MHT CET ची अधिकृत वेबसाईट किंवा mhtcet2021.mahacet.org ला भेट द्या.
- होम पेजवर निकाल जाहीर होताच 'MHT CET Result 2021'लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.
- तुमचे क्रेडेंशिअल टाकून लॉगिन करा.
- तुमच्या स्क्रिन वर तुमचा निकाल पाहता येणार आहे.
- निकालाची प्रत डाऊनलोड करू शकता.
MHT CET 2021 ही परीक्षा महाराष्ट्रात इंजिनियरिंग, फार्मसी आणि कृषी क्षेत्रातील अंडरग्रॅज्युएट कोर्सच्या विद्यार्थ्यांसाठी असते. या मार्कांवर त्यांचे कॉलेजचे प्रवेश निश्चित केले जातात. PCM आणि PCB अशा दोन पर्यायांमध्ये ही परीक्षा घेतली जाते. त्यांचे निकाल एकाच वेळी जाहीर केले जातात. मार्कांनुसार रॅन्क देखील निकालामध्ये दिला जातो. प्रत्येक कॅटेगरीनुसार रॅन्क वेगवेगळा दिला जातो.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)